NMC Reservation: नागपूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर, SC/ST प्रवर्गात महिलांसाठी कोणते प्रभाग?

Last Updated:

Nagpur Municipal Corporation Reservation: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज कविवर्य सुरेश भट सभागृहात काढण्यात आली आहे.

News18
News18
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज कविवर्य सुरेश भट सभागृहात ११ वाजता काढण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्या प्रभागामध्ये कोण उभं राहणार? याचं राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून माजी नगरसेवकांसह इच्छुकांचं या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलं होते. आता अखेर नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं आहे.
सध्या नागपुरात नगरसेवकांची एकूण सदस्य संख्या १५१ असून... ३८ प्रभाग आहेत. त्यांपैकी ३७ प्रभागात चार सदस्य तर ३८ क्रमांकाचा प्रभाग तीन सदस्यीय असणार नगरसेवकांच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ७६ नगरसेविका आणि ७९ नगरसेवक असणार आहेत.

नागपूर महानगर पालिकेसाठी आरक्षण सोडत, अशी असणार आरक्षित जागांची संख्या

advertisement
एकूण जागा - १५१
सर्वसाधारण - ६९
इतर मागास प्रवर्ग - ४०
अनुसूचित जाती - ३०
अनुसूचित जमाती - १२

नागपूर महानगर पालिका अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग

नागपुरात अनुसुचित जातीसाठी एकूण 30 प्रभाग... त्यातील 15 महिला आरक्षण
२ अ
४ अ
५ अ
६ अ
७ अ
१० अ
advertisement
१२ अ
१४ अ
१७ अ
२४ अ
२५ अ
२९ अ
३० अ
३२ अ
३७ अ

नागपूर महानगर पालिका एसटी महिला राखीव प्रभाग- एकूण 6

- 20 ब
- 14 ब
- 8 अ
- 34 ब
- 21 अ
- 13 ब
नागपूर महानगरपालिकेसाठी इतर मागास वर्गीयांचं आरक्षण अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. लवकरच हे आरक्षण जाहीर केलं जाईल. नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
NMC Reservation: नागपूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर, SC/ST प्रवर्गात महिलांसाठी कोणते प्रभाग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement