क्रिकेट खेळायला गेला अन् परतलाच नाही, नागपूरच्या प्रणवचा हृदयद्रावक शेवट, नक्की काय घडलं?

Last Updated:

Nagpur Crime news: नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं क्रिकेट खेळायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

News18
News18
नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं क्रिकेट खेळायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वी संबंधित मुलाच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला आहे. अशात आता मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. अवघ्या दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रणव अनिल आगलावे असं मृत पावलेल्या १४ वर्षीय मुलाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. पण क्रिकेट खेळताना अनर्थ घडून त्यांचा मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

भिवापूर येथील ही घटना बुधवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. प्रणव आगलावे हा भिवापूर महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या काही मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असताना अचानक चेंडू वेगाने प्रणवच्या छातीला लागला. चेंडूचा जोरदार आघात होताच प्रणव जमिनीवर कोसळला.
advertisement
प्रणव कोसळल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी कोणतीही वेळ न दवडता त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रणवला मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना आणि भिवापूर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.

दोन महिन्यांत कुटुंबावर दुहेरी आघात

प्रणव आगलावे हा भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववीत शिकत होता. त्याचे वडील अनिल आगलावे यांचं दोन महिन्यांपूर्वी अकाली निधन झालं होतं. वडिलांच्या जाण्याचे दुःख ताजं असतानाच, आता प्रणवचाही दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाला आहे. यामुळे आगलावे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील पिता-पुत्राच्या अकाली निधनामुळे भिवापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
क्रिकेट खेळायला गेला अन् परतलाच नाही, नागपूरच्या प्रणवचा हृदयद्रावक शेवट, नक्की काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement