advertisement

मोठी बातमी! नागपुरात सुरक्षा रक्षकाला मारहाण करत 6 विधिसंघर्षग्रस्त मुलं रिमांड होममधून पळाले

Last Updated:

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
नागपूर, 25 डिसेंबर, उदय तिमांडे : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. रिमांडहोममध्ये असलेल्या सहा विधिसंघर्षग्रस्त मुलांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून रिमांड होममधून पलायन केलं आहे. जाण्यापूर्वी त्यांनी रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची देखील तोडफोड केली आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत या मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महिला व बालकल्याण विभागामार्फत या विधिसंघर्षग्रस्त मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या मुलांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून रिमांड होममधून पलायन केलं आहे. सहा मुलं रिमांड होममधून पळून गेले आहेत. या मुलांच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. पळून जाण्यापूर्वी त्यांनी रिमांड होममध्ये असलेल्या सामानाची आणि सीसीटीव्हीची देखील तोडफोड केली आहे.
advertisement
या घटनेनं खळबळ उडाली आहे, जी सहा मुलं रिमांड होममधून पळून गेली आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. दरम्यान आता या प्रकरणात कपिल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मोठी बातमी! नागपुरात सुरक्षा रक्षकाला मारहाण करत 6 विधिसंघर्षग्रस्त मुलं रिमांड होममधून पळाले
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement