2 मुलांच्या आईवर जडला जीव, लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट, नांदेडमध्ये भेटायला बोलवून खेळली रक्ताची होळी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nanded News: विवाहितेसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली आहे.
नांदेड: विवाहितेसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली आहे. थडी सावळी येथे ३ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या सात नातेवाईकांना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश्वर ठाकूर असं हत्या झालेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी होता. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. त्याचं त्याच्याच नात्यातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. संबंधित महिलेला दोन मुलंही आहेत. मात्र, या प्रेमसंबंधांची कुणकुण महिलेचा पती आणि इतर नातेवाईकांना लागली होती. याच रागातून दुर्गेश्वरचा काटा काढण्याचं नियोजन संशयितांनी केलं.
advertisement
घरातून बोलावून घेतले आणि घात केला
३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयितांनी दुर्गेश्वरला त्याच्या घरातून थडी सावळी येथे बोलावून घेतलं. तो तिथे पोहोचताच आधीच तयारीत असलेल्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. संशयितांनी केबल वायरने दुर्गेश्वरच्या पाठीवर, छातीवर आणि पायावर सपासप वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुर्गेश्वरच्या गुप्तांगावर जोरात लाथा मारल्या. यामुळे त्याला वेदना असह्य होऊन उलट्या झाल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
सात आरोपींना अटक
या प्रकरणी मृताचे वडील रवींद्रसिंह ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात संशयितांना अटक केली. पद्मसिंह ठाकूर, राजूसिंह ठाकूर, गंगासिंह ठाकूर, दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. घटनेचा पुढील तपास रामतीर्थ पोलीस करत आहेत.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 8:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 मुलांच्या आईवर जडला जीव, लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट, नांदेडमध्ये भेटायला बोलवून खेळली रक्ताची होळी









