VIDEO : नांदेडमध्ये तरूणाचा तुफान राडा, धावत्या कारवर चढून चालकाला चोप चोप चोपलं, कारण...

Last Updated:

नांदेडच्या आयटीआय चौकात ही घटना घडली आहे. हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणाने चक्क चारचाकी वाहनावर चढून चालकाला मारहाण केली आहे.

nanded news
nanded news
Nanded News : नांदेडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत हॉर्न वाजवल्याच्या कारणास्तव एका कारचालकाला कारवर चढवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना कारचालक गाडी चालवत होता आणि तरूण टपावर बसून कारचालकाला मारहाण करत होता. या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर संबधित कारचालक थेट कार घेऊन पोलीस ठाण्यातच पोहोचला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणावर आता पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.
नांदेडच्या आयटीआय चौकात ही घटना घडली आहे. हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणाने चक्क चारचाकी वाहनावर चढून चालकाला मारहाण केली आहे.विशेष म्हणजे या घटनेत ज्या व्यक्तीला मारहाण केली आहे ती व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. प्रकाश नागरगोजे असे या डॉक्टरचे नाव आहे. लोहा तालुक्यातील मालकोळी येथे त्यांचं रुग्णालय आहे. नेहमी प्रमाणे ते आज चार चाकी वाहनातून हॉस्पिटला जातं होते त्या दरम्यान ही घटना घडली आहे.
advertisement
खरं तर आयटीआय चौकात वाहतूक कोंडी झाल्याने प्रकाश नागरगोजे यांनी हॉर्न वाजवला होता. त्यावरून तरुणाने हॉर्न का वाजवत आहात अस म्हणत त्यांना सूरूवातीला नागरगोजे यांना शिविगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तरूणाचा पारा इतका चढला की तो थेट नागरगोजे यांच्या कारवर चढला आणि त्यानी टपावरून त्यांना मारहाण करण्यास सूरूवात केली. विशेष म्हणजे ही मारहाण सूरू असताना कार देखील धावत होती.
advertisement
या घटनेनंतर नागरगोजे यांनी थेट तरूणासह कार पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तरूणावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : नांदेडमध्ये तरूणाचा तुफान राडा, धावत्या कारवर चढून चालकाला चोप चोप चोपलं, कारण...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement