'आंचलला मी मुलगी मानणार नाही, माझा...', सक्षमच्या आईची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या 19 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या 19 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवारच्या वडिलांनी आणि भावांनी केला आहे. या हत्याकांडानंतर आंचलने सक्षमच्या पार्थिव देहाची लग्न केलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर आपले वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसात साक्ष दिली. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही तिने केली.
यानंतर आता सक्षमच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी आंचलला मुलगी मानणार नाही. तर माझा मुलगाच मानणार अशी प्रतिक्रिया सक्षमची आई संगिता ताटे यांनी दिली. माझ्या मुलाचे सर्व हक्क दिला देणार. आयुष्यभर तिची साथ सोडणार नाही, असा शब्दही सक्षमच्या आईनं दिला. शिवाय सक्षमची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आंचल आपल्या घरी राहत असल्याची माहिती देखील संगिता ताटे यांनी दिली.
advertisement
न्यूज १८ लोकमतला प्रतिक्रिया देताना सक्षमच्या आई संगिता ताटे यांनी सांगितलं की, सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. भेटल्यानंतर ती खूप रडली आणि माझ्यासोबत माझ्या घरी आली, असं सक्षमची आई संगीता ताटे म्हणाल्या. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली तुमच्या घरी येते. मी त्या दिवशी तिला घरी घेऊन आले, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
संगीता ताटे पुढे म्हणाल्या, "जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते. तसंच प्रेम मी आंचलवर देखील करेल. मी तिला मुलगी मानणार नाही, तर माझा मुलगाच मानणार. तिला माझ्या मुलाचा अधिकार देईन. तिच्यात मी सक्षमला पाहीन. मला मुलगी नाही, माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेन. आयुष्यभर आंचलवर प्रेम करेल, जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत प्रेम करेल. तिने माझी साथ नाही सोडली, तर मी पण आयुष्यभर तिची साथ सोडणार नाही, असंही सक्षमची आई म्हणाली. माझी मागणी आहे माझ्या मुलांना न्याय मिळावा."
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
December 01, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आंचलला मी मुलगी मानणार नाही, माझा...', सक्षमच्या आईची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली...


