Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; नांदेडमधील घटना

Last Updated:

Aditi Tatkare : नांदेड येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

News18
News18
नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात घडला. शहरातील आसना बायपास परिसरात गाडी डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरल्याने ही घटना घडली. या गाडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. आदिती तटकरे यांचा ताफा भोकर येथून विमानतळाकडे येत होता. या दरम्यान नांदेड शहरालगत आसना बायपास परिसरात हा अपघात घडला. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे याच्या उपस्थित नांदेडच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आदिती तटकरे नांदेड विमानतळाकडे जात असताना नांदेड शहराजवळ ही घटना घटना घडली.
मराठी बातम्या/नांदेड/
Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; नांदेडमधील घटना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement