advertisement

Nanded : 'माझ्या बापाला फाशी द्या...', बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलने सांगितलं गुरूवारी काय घडलं होतं?

Last Updated:

Nanded Saksham Tate Murder Case : मी सक्षमच्या घरी सून म्हणून राहणार. मी त्याच्या नावाचं कुंकू लावलंय. माझं वय पूर्ण आहे, त्यामुळे माझ्यावर कुणाचीही जबदरस्ती नाही, असंही आंचलने म्हटलं आहे.

Nanded Saksham Tate Murder Case
Nanded Saksham Tate Murder Case
Nanded Crime Honor Killing : त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की! त्यात तुमचं काय गेलं? कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आजही काळोख्या मानसिकतेला प्रेमाला नवा ऊर्जा देणारं आहे. महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत बापाने आणि भावानेच 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं

सक्षम ताटे (वय 25) आणि आंचल मामीडवार (वय 21) या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आंचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. या विरोधातून आंचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. आंचलने या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला अन् सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं अन् प्रेम अजरामर आहे, याची प्रचिती दिली. मी त्याच्या नावाचं कुंकू लावते असं म्हणत तिने आपल्या बापाविरुद्ध एल्गार केला अन् भावासह त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केलीये.
advertisement

नशा करायला लावली अन् तीन गोळ्या झाडल्या

सक्षमवर एमपीडीए पडली होती, तो बाहेर आल्यावर माझ्या वडिलांना त्याचा खून करायचा होता. त्यांनी तशी मला धमकी देखील दिली होती. त्याला गोड गोड बोलून माझ्या भावाने आणि वडिलांनी दिली होती. त्यानंतर त्याला नशा करायला लावली अन् त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागून देखील त्याला काही झालं नसल्याचं पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला मारलं. आमचे प्रेम होतं, पण कास्टमुळे आमच्या लग्नाला माझ्या कुटूंबियांकडून विरोध केला जात होता, असं आंचलने सांगितलं.
advertisement

मी त्याच्या नावाचं कुंकू लावलंय

सक्षम आणि माझे भाऊ चांगले मित्र होते, पण त्यांच्या काहीतरी भांडणं होती. माझ्या काहीही इच्छा नाही आता... आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. माझ्या वडिलांनी आणि दोन भावांनी मिळून त्याला मारलं आहे. मी सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करणार आहे. मी सक्षमच्या घरी सून म्हणून राहणार. मी त्याच्या नावाचं कुंकू लावलंय. माझं वय पूर्ण आहे, त्यामुळे माझ्यावर कुणाचीही जबदरस्ती नाही, असंही आंचलने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : 'माझ्या बापाला फाशी द्या...', बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलने सांगितलं गुरूवारी काय घडलं होतं?
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement