महादेव मुंडे खून प्रकरणातील संशयिताच्या नार्को चाचणीचा अहवाल आला, पण पोलिसांनी 'या' एका कारणामुळे ठेवला गुपित
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एसआयटीने काही संशयित व्यक्तींच्या पॉलीग्राफ, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस अशा चाचण्या केल्या आहेत.
बीड: परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता एक महत्त्वाची माहिती आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी काही संशयित व्यक्तींच्या पॉलीग्राफ, लाय डिटेक्टर, ब्रेक मॅपिंग व नार्को एनालिसिस या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय असून, त्याबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.
21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथे महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाने विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपासाचा भाग म्हणून एसआयटीने काही संशयित व्यक्तींच्या पॉलीग्राफ, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस अशा विविध आधुनिक मानसशास्त्रीय चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांतून तपासाला दिशा मिळणारे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
advertisement
अफवांना उधाण आले
गेल्या काही दिवसांपासून या चाचण्यांच्या अहवालांबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने स्पष्ट केले की, सदर अहवाल हे अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते केवळ तपास यंत्रणेकडे सुरक्षित आहेत. हे अहवाल कोणत्याही खासगी व्यक्तीस किंवा संस्थेस दाखवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अहवालातील निष्कर्षांबाबत जे दावे केले जात आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही.
advertisement
अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई
तपास अधिकारी यांनी इशारा दिला आहे की, या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होईल किंवा समाजात संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारच्या अफवा कोणी पसरवल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तपास यंत्रणा शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे खुन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महादेव मुंडे खून प्रकरणातील संशयिताच्या नार्को चाचणीचा अहवाल आला, पण पोलिसांनी 'या' एका कारणामुळे ठेवला गुपित









