advertisement

'घोर अपराध, घोर अपराध', भोंदू खरात ओरडायला लागला; पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीत नेमकं काय घडलं?

Last Updated:

खरातने पहिल्याच दिवशी कोठडीत मोठा राडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर अशोक खरात एका झटक्यात सुतासारखा सरळ झाला.

News18
News18
नाशिक :  नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बेड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या खरातच्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागलीय. त्यात आता एसआयटी चौकशी सुरु झाल्यानं आणखी कोणते लागेबांधे समोर येतात हे पाहाणं महत्वाचं आहे. दरम्यान नाशिकच्या भोंदूबाबची कोठडीत चांगलीच जिरल्याचे समोर आलं आहे. पहिल्याच दिवशी कोठडीत मोठा राडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर अशोक खरात एका झटक्यात सुतासारखा सरळ झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी बेड्या ठोकल्यानंतर पहिल्या दिवशी खरात कोठडीत एकदम शांत होता. त्याने मौनव्रत धारण केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे खरातने उत्तर दिले नाही. पोलीस वारंवार प्रश्न विचारत होते मात्र खरातने पोलिसांसमोर तोंड उघडले नाही. तक्रारीत पीडितेने केलेल्या आरोपावर देखील पोलिसांनी खरातला विचारले मात्र त्याने शांत राहणे पसंत केले.
advertisement
अखेर पोलिसी खाक्या दाखवत उलटतपासणी सुरू केली. त्यानंतर मौन धारण केलेला अशोक खरात संतापला. कोठडीत मोठ्याने ओरडायला लागला, डोळे मोठे करत थरथरत्या आवाडात घोर अपराध, घोर अपराध असे म्हणत ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले पोलीस कर्मचारी देखील आत घाबरून आले. मात्र काही वेळातच पोलिसांच्या पोलिसांच्या तड्याख्यामुळे काही वेळातच त्याला चांगलाच घाम फुटला आणि तो पुन्हा शांत झाला.
advertisement

खरातच्या कारनाम्याची आता एसआयटीमार्फत चौकशी सुरु

नाशिकमध्ये तंत्रज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याची आता एसआयटीमार्फत चौकशी सुरु झाली आहे. गुरुवारी दोन तास भोंदू अशोक खरातची एसआयटीच्या पथकानं चौकशी केली. भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनचं राज्य सरकारनं चौकशीसाठी एसआयटीची स्थापन केली आहे. भोंदू अशोक खरातवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात अशोक खरातचा एक पेनड्रायव्ह पोलीसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये महिलांचे 58 अक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय.
advertisement

खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा

दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकानं अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा मारला. या फॉर्म हाऊसमध्ये एक पिस्तूल पोलिसांच्या हाती लागलं आहे. तसेच काही जीवंत काडतूसं आणि वापरलेल्या काडतूसांच्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोबतच काही महत्त्वाचे दस्तावेज आणि मालमत्ते संदर्भातील कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. आता खराच्या संपत्तीचा उलगडा होऊ लागला आहे.
advertisement

एसआयटी चौकशीत त्याचे एक एक कारनामे उघड होणार

शिर्डीत मोक्याच्या ठिकाणी खरातच्या पत्नीच्या नावे जमीन असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षात त्यानं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीतून निवृत्ती घेतल्यानंतर खरात ज्योतिषशास्त्राकडं वळला. आणि अल्पावधीतचं त्यानं राजाश्रय मिळवला. अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून त्यानं मोठा भक्तवर्ग तयार केला होता. अघोरी उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. आता एसआयटी चौकशीत त्याचे एक एक कारनामे उघड होणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'घोर अपराध, घोर अपराध', भोंदू खरात ओरडायला लागला; पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीत नेमकं काय घडलं?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement