advertisement

बुटाची लेस बांधण्यासाठी खाली वाकला आणि शिक्षकाच्या कारने उडवलं, नाशिकमध्ये थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

इगतपुरीतील लिटल ब्लॉसम शाळेत शिक्षक यश कदम यांच्या कारने ६ वर्षीय मुलगा जखमी झाला. शाळेवर प्रकरण दाबण्याचा आरोप, पालकांचा संताप, सीसीटीव्ही फुटेज समोर.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: शाळेची घंटा वाजली, मुलं दप्तर घेऊन बाहेर पडले. काही मुलं मैदानावर खेळत होती, तर काही मुलं दप्तर आनंदाने उडवत घरी निघाले होते. अचानक चालता चालता 6 वर्षांचा मुलगा थांबाला. त्याच्या बुटाची लेस सुटली होती. चालताना त्याला ती सारखी त्रास देत होती म्हणून तो थांबला आणि बुटाची लेस बांधण्यासाठी वाकला. तेवढ्यात जे घडलं ते पाहून उपस्थित मुलांच्या अंगावर काटा आला. मुलगा बुटाची लेस बांधत असताना अचानक त्याच्या अंगावरून चारचाकी कार गेली.
ही कार दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर त्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाची होती. नाशिकच्या इगतपुरी येथील लिटल ब्लॉसम शाळेच्या आवारात एका ६ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाच्या कारने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही होत आहे.
advertisement
बूट बांधण्यासाठी खाली वाकला अन्...
शाळा सुटण्याच्या वेळी पहिलीत शिकणारा हा चिमुकला शाळेच्या आवारात आपल्या बुटाची लेस बांधण्यासाठी खाली वाकला होता. याच वेळी शिक्षक यश कदम यांची कार तिथून जात होती. चिमुकला खाली वाकलेला असल्याने चालकाच्या लक्षात आले नाही आणि कारचे चाक थेट विद्यार्थ्याच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला ४ टाके पडले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? शाळेवर गंभीर आरोप
या अपघातानंतर शाळा व्यवस्थापनाने संवेदनशून्य भूमिका घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. "शाळेने सुरुवातीला अपघाताची चुकीची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास टाळाटाळ केली आणि संपूर्ण प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला," असा दावा पालकांनी केला आहे. दरम्यान, या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यावरून चालकाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुटाची लेस बांधण्यासाठी खाली वाकला आणि शिक्षकाच्या कारने उडवलं, नाशिकमध्ये थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement