नाशिककरांनाही बसला धक्का! राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2026 : यंदाच्या महापालिका निवडणुकीत नाशिकच्या राजकीय इतिहासात कधीही न घडलेली घटना पाहायला मिळाली. प्रचार, उमेदवारी आणि निकालापेक्षा काही वेगळ्याच कारणांमुळे ही निवडणूक गाजली.
नाशिक : यंदाच्या महापालिका निवडणुकीत नाशिकच्या राजकीय इतिहासात कधीही न घडलेली घटना पाहायला मिळाली. प्रचार, उमेदवारी आणि निकालापेक्षा काही वेगळ्याच कारणांमुळे ही निवडणूक गाजली. कारागृहातून लढलेली उमेदवारी, मतदानाच्या तोंडावर फरार झालेला उमेदवार आणि त्याच पार्श्वभूमीवर एका नवख्या चेहऱ्याचा विजय या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
लोंढे उर्फ बॉसला नाकारले
आरपीआयचे उमेदवार प्रकाश लोंढे यांनी थेट कारागृहातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र मतदारांनी त्यांच्या उमेदवारीला स्पष्ट नकार दिला. गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या उमेदवाराला नाशिककरांनी सपशेल पराभूत करत कडक संदेश दिला. याउलट, भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमिसे हे सध्या कारागृहात असतानाही त्यांच्या मुलगा रिद्धीश निमिसे यांनी निवडणुकीत बाजी मारली. हा निकाल मतदार कुटुंबीयांमधील वेगवेगळ्या प्रतिमांकडे कसा पाहतात, याचेही द्योतक ठरला.
advertisement
उमेदवार कमलेश बोडके मतदानाआधी फरार
दरम्यान, शिंदेसेनेचे उमेदवार कमलेश बोडके हे मतदानाच्या आदल्या दिवशीच फरार झाल्याने निवडणुकीत आणखी एक नाट्य निर्माण झाले. विरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याच्या अपहरणप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कारवाईची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच नव्हे, तर मतमोजणीपर्यंतही बोडके फरारच राहिले. उमेदवार स्वतःच गैरहजर असल्याने त्यांच्या प्रचार यंत्रणेलाही मोठा फटका बसला.
advertisement
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे वाद
प्रकाश लोंढे हे नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ या विशेष मोहिमेतील पहिल्या मोठ्या कारवाईत अटक झालेल्या व्यक्तींमध्ये होते. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये लोंढे, त्यांची दोन्ही मुले आणि टोळीतील इतर सदस्य सध्या कारागृहात आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:59 AM IST










