advertisement

PUBG खेळताना वडिलांनी हटकलं, पोरगं घर सोडून निघून गेलं, 48 तासांपासून बेपत्ता,नेमकं काय घडलं?

Last Updated:

मोबाईलवर पब्जी खेळताना वडिलांनी हटकल्याने मुलगा घर सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मुलाचा पत्ता लागला नाही त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

News18
News18
Nashik News : लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी,नाशिक : आजकालची तरूण मोबाईलमध्ये प्रचंड व्यस्त झाली आहे. त्यातल्या त्यात ते गेम यामुळे तर ती फारच वेडी झाली आहे. या गेमच्या नादापाई कुणी जेवत नाही. कुणाचे अपघात झाले अशा एक अनेक घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असताना आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मोबाईलवर पब्जी खेळताना वडिलांनी हटकल्याने मुलगा घर सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मुलाचा पत्ता लागला नाही त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खरं तर पब्जी या गेमने सगळ्या तरूणाईला वेड लावले आहे. या गेमच्या पुढे तरूणाला काही दिसत नाही. अशा गेम्सवर बंदी घालण्याचीही मागणी झाली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आहे.अशाच पब्जीचा नाद नाशिकमधल्या एका 17 वर्षीय मुलाला होता. त्यामुळे या नादापाई कुटुंब पोरावर प्रचंड रागवायचं.
घटनेच्या दिवशी देखील मुलगा पब्जी खेळत असल्याने पाहून त्याच्या वडिलांनी त्याला हटकले. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला आणि तो घर सोडून निघून गेला.सूरूवातीला कुटुंबियांना वाटले तो इथेच बाहेर जाईल आणि मित्रांसोबत फिरेल. पण झालं उलटच मुलगा परतलाच नाही. त्यामुळे सरकार वाडा पोलीस ठाण्यात आईने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.पण दोन दिवस उलटून गेले आहेत पण त्याचा अद्याप शोध लागला नाही आहे.
advertisement
तसेच मुलगा सोबत मोबाईलही घेऊन गेला मात्र फोन नॉट रिचेबल लागत असल्याने कुटुंब चिंतेत आहे.तसेच मुलगा दोन दिवसांपासून घरात न आल्याने कुटुंबिय देखील घाबरले आहेत. त्याच्याबद्दल नको नको ते विचार त्यांच्या मनात येत आहेत.आता या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PUBG खेळताना वडिलांनी हटकलं, पोरगं घर सोडून निघून गेलं, 48 तासांपासून बेपत्ता,नेमकं काय घडलं?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement