Onion Issue : कांदाप्रश्न तापला! निर्यातबंदीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना सरकारचा इशारा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सलग तीन दिवसांपेक्षा जास्त बाजार समिती बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार आहेत. याबाबत सहकार विभागाकडून बाजार समित्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 10 डिसेंबर : केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बाजार समितीत कामकाज ठप्प झाले आहे. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत. दरम्यान, आता सहकार विभाग एक्शन मोडमध्ये आले असून लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सलग तीन दिवसांपेक्षा जास्त बाजार समिती बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार आहेत. याबाबत सहकार विभागाकडून बाजार समित्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे गाळाधारक व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ववत करण्याचे आवाहन सहकार विभागाने केलं आहे.
बाजार समित्यांमधील साप्ताहिक सुट्टीचा दिवस (रविवार) वगळला जाणार असल्याचंही सहकार विभागाने सांगितलं. जिल्ह्यातील जवळपास ६० ते ७० टक्के व्यवहार बंद असल्याचं निरीक्षण सहकार विभागाने नोंदवलं आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला आहे.
advertisement
171 कंटेनर अडकले, कांदा सडण्याची भिती
view commentsमार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच अवकाळीने कोलमडलेला शेतकरी अजून संकटात आला आहे. या निर्णयानंतर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात तिसऱ्या दिवशीही लिलाव आहे ठप्प आहे. परिणामी साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला असून मुंबई बंदरावर निर्यातदारांचे 171 कंटेनर अडकून पडले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2023 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Onion Issue : कांदाप्रश्न तापला! निर्यातबंदीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना सरकारचा इशारा


