खान्देशचा प्रसिद्ध पदार्थ खिचडी, नाशिकमध्ये याठिकाणी मिळते फक्त 25 रुपयांत, खवय्यांची होते मोठी गर्दी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
दिनेश खैरनार नावाच्या एका व्यक्तीने अगदी 25 रुपयात खिचडी विकण्याचा निर्णय घेतला. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले. यानंतर त्यांनी नाशिकमधील उत्तम नगरमध्ये खिचडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या खाद्यसंस्कृतीची आता अनेक ठिकाणी चर्चा होत आहे. याठिकाणी खाण्यासाठी अनेक पदार्थ मिळतात तसेच आता खान्देशात प्रसिद्ध असलेली खिचडीदेखील नाशिकमध्ये एका ठिकाणी अत्यंत कमी दरात मिळत आहे. ही खिचडी फक्त 25 रुपयांना मिळत आहे. एका व्यक्तीची एका वेळेची भूक ही सहज भागू शकते.
दिनेश खैरनार नावाच्या एका व्यक्तीने अगदी 25 रुपयात खिचडी विकण्याचा निर्णय घेतला. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले. यानंतर त्यांनी नाशिकमधील उत्तम नगरमध्ये खिचडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अन्नपुर्णा खिचडी या नावाने सुरू केला हा व्यवसाय आता सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे.
advertisement
Samosa Kadhi : समोसा आणि कढी या यूनिक कॉम्बिनेशनला नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद, हे आहे लोकेशन, VIDEO
सर्वसामान्य लोकांना ही खिचडी परवडावी आणि त्यांचे पोट भरावे, या उद्देशाने ना नफा ना तोटा या संकल्पनेने दिनेश यांनी खिचडी बनविण्याचे चालू केले. दिनेश हे स्वतः आपल्या हाताने ही खिचडी बनवतात. खिचडीत सोयाबीन वगैरे, असे पोषक घटकही असतात.
advertisement
कॉलेजची मुले अथवा सामान्य वर्ग याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. आपला एक वेळच्या जेवणाचा खर्च हा बाहेर 150-200 रुपयए इतका होता. मात्र, याठिकाणची खिचडी ही सामान्य लोकांना परवडणारी आहे. सहज बनणारी आणि चविष्ट अशी खिचडी 25 रुपयात मिळते, त्यामुळे याठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळते.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 09, 2024 6:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
खान्देशचा प्रसिद्ध पदार्थ खिचडी, नाशिकमध्ये याठिकाणी मिळते फक्त 25 रुपयांत, खवय्यांची होते मोठी गर्दी

