शेतकऱ्याची पोरगी आज आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर, भारतातील प्रो कार्ड पहिली महिला खेळाडू स्नेहल कोकणे EXCLUSIVE
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
भारतातील पहिली महिला प्रो कार्डधारक खेळाडू ही नाशिकची आहे. स्नेहल कोकणे असे या खेळाडूचे नाव आहे. स्नेहलने बॉडी बिल्डिंगच्या खेळात आपल्या भारताचे नाव उंचावले आहे.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रात भारतातील महिला या देशाचे नाव मोठे करत आहेत. देशाला गर्व होईल अशी कामगिरी करत आहेत. आज अशाच एका महिला खेळाडूची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. स्नेहल कोकणे असे या खेळाडूचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील स्नेहलने आज सर्वांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे. लोकल18 च्या टीमने त्यांच्या कामगिरीची घेतलेला हा आढावा.
advertisement
भारतातील पहिली महिला प्रो कार्डधारक खेळाडू ही नाशिकची आहे. स्नेहल कोकणे असे या खेळाडूचे नाव आहे. स्नेहलने बॉडी बिल्डिंगच्या खेळात आपल्या भारताचे नाव उंचावले आहे. स्नेहल ही नाशिक येथील एका शेतकरी कुटुंबातुन येते. तिने आतापर्यंत अनेक सुवर्णपदके जिंकली असून तिला आतापर्यंत तब्ब्ल 125 नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ती पहिली भारतीय महिला प्रो कार्ड धारक, महिला बॉडी बिल्डर भारत श्री, आशिया श्री, मिस इंडिया, मिस आशिया, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, आयएफबीबी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणारी पहिली महिला स्पर्धक तसेच इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे.
advertisement
शेतकरी कुटुंबातील स्नेहलचा आज जगात डंका वाजत आहे. कुठला प्रश्न मनात न ठेवता तिने या क्षेत्रात येण्याचे ठरविले. खरंतर या क्षेत्रात शरीर बनविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे कुठल्या स्पर्धेसाठी उभे राहायचे म्हटल्यावर अर्धे नग्न कपडे हे आपल्याला अंगावर घालायचे असतात. परंतु तिने कुठलीही पर्वा न करता आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
advertisement
काय म्हणाली स्नेहल कोकणे -
लोकल18 शी बोलताना स्नेहलने सांगितले की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला माझा कुटुंबाचा आणि विशेष म्हणजे माझ्या पतीचा खंभीर पाठिंबा आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात आता मागे राहिलेल्या नाहीत, असेही तिने सांगितले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Aug 03, 2024 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
शेतकऱ्याची पोरगी आज आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर, भारतातील प्रो कार्ड पहिली महिला खेळाडू स्नेहल कोकणे EXCLUSIVE









