नाशिक: घरात एकटीला पाहून साधला डाव, नराधमाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडित गर्भवती राहिली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nashik: नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.
नाशिक: नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. आरोपीनं पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला गर्भवती केलं. यानंतर लग्नाला नकार दिला. याप्रकरणी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दीपककुमार रमेशकुमार पाल असं गुन्हा दाखल झालेल्या २१ वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तो नाशिक रोड परिसरातील तिरुपतीनगरात राहतो. त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) अर्थात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित दीपककुमार पाल याने २०२४ पासून त्यांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. मुलगी घरी एकटी असताना, संशयिताने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. मात्र, जेव्हा पीडितेने संशयिताला लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला.
advertisement
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने थेट उपनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत दीपककुमार पाल विरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 24, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिक: घरात एकटीला पाहून साधला डाव, नराधमाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडित गर्भवती राहिली अन्...