Accident News : 3 सेंकदात जीव गेला, भरधाव ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला चिरडलं, अपघाताचा थरारक VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका भरधाव ट्रव्हल्सने मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News : किशोर गोमाशे, वाशिम :वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका भरधाव ट्रव्हल्सने मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला आहे.संध्या उमेश सारसकर असे या 16 वर्षीय मुलीचे नाव आहे. वाशिम च्या पुसद मार्गावरील काकड दाती फाट्या जवळ ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम च्या पुसद मार्गावरील काकड दाती फाट्या जवळ संध्या सारसकर ही मुलगी सायकलवरून शिकवणीसाठी जात होती.यावेळी सायकलने रस्ता ओलांडत असताना वाशिम कडून पुसद कडे भरधाव वेगात जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सने समोरून तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ती दुरपर्यंत फेकली गेली. या अपघातात संध्या सारसकर हीचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे
advertisement
संध्या सारसकर या 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीन च्या अपघाती मृत्यू मुळे हळहळ व्यक्त आहे. तसेचे या अपघातास दोषी असणार्या ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान काकड दाती फाट्यावर भरधाव वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढली असून या साठी मार्गावर स्पीड ब्रेकर बसविण्यासह तेथील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भरघाव कंटेनरची कार आणि बाईकला भीषण धडक
advertisement
वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका भरघाव कंटनरने कार आणि बाईकला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भीषण होती की कार आणि बाईक दूर पर्यंत फेकले गेले होते. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी आहे. वाशिमच्या अकोला-नांदेड महामार्गावर हा अपघात घडला आहे. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील अकोला नांदेड महामार्गावरील सोया फॅक्टरी जवळ ही अपघाताची घटना घडली आहे.या घटनेत भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकी आणि कारला मागील बाजूस भीषण धडक दिली होती. ही धडक इतकी जोरात होती ती दोन्ही वाहने दुरवर फेकल्या गेल्या होत्या. हा भीषण अपघात सायंकाळ दरम्यान घडला होता.
भरधाव कंटेनरने अगोदर कारला मागील बाजूने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार महामार्गाच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली.यातील 3 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर कंटेनर चालक भरधाव वेगात पळून जात असताना दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकी वरील दोघे खाली पडले.यातील महिला कंटेनर खाली चिरडून जागीच ठार झाली तर दुचाकी चालक मृत्यूशी झुंज देत आहे.
Location :
Washim,Maharashtra
First Published :
September 05, 2025 11:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : 3 सेंकदात जीव गेला, भरधाव ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला चिरडलं, अपघाताचा थरारक VIDEO