कुत्रा कापला, रक्ताळलेली रात्र, क्लास चालकाचा विद्यार्थिनीसोबत.., अशोक खरातचा आणखी एक अघोरी कांड!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ashok Kharat latest News: अशोक खरातचा २५ वर्षांपूर्वीचा एक भयंकर कांड उघडकीस आला आहे. त्याने अघोरी कृत्य करत एका कुत्र्याचा बळी दिला होता. तसेच क्लास चालकाला विद्यार्थिनीसोबत...
Ashok Kharat News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा सातवा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीने त्याच्याविरोधात गुंगीचं औषध पाजून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. अशाच प्रकारे खरातने आणखी कुणाचं लैंगिक शोषण केलं असेल तर अशा महिलांनी समोर यावं, तक्रार द्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अशोक खरातचा २५ वर्षांपूर्वीचा एक भयंकर कांड उघडकीस आला आहे. त्याने अघोरी कृत्य करत एका कुत्र्याचा बळी दिला होता. तसेच एका क्लास चालकाला त्याच्याच क्लासमधील एका विद्यार्थिनीसोबत दुसरा विवाह करायला भाग पाडलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तपत्राने जुन्या जाणत्या गावातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
खरं तर, एखाद्यावर मोठं अरिष्ट येऊ घातलंय, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी पूजा करावी लागेल, असं सांगत खरात अनेकांना गिऱ्हाईक बनवायचा. गेल्या २०-३० वर्षांपासून त्याच्या अशा पूजांच्या अनेक सुरस कथा त्याच्या भक्तांमध्ये चर्चिल्या जात होत्या.
नाशिकला पंचवीस वर्षांपूर्वी करिअरवर मार्गदर्शन करणाऱ्या सिन्नर तालुक्यातीलच एका खासगी क्लास चालकाला धंद्यातल्या बरकतीसाठी त्याने अशाच एका पूजेचा मार्ग सुचवला होता. क्लासच्या जागेत दोघा पती-पत्नीला बसवत त्याने रात्री उशिरा पूजा विधी केला होता.
advertisement
या पूजेच्या वेळी कुत्र्याचा बळी दिल्याची चर्चा होती, रक्ताळलेल्या त्या रात्रीचा सारा तमाशा खिडकीतून क्लासच्याच काही मुलांनी पाहिला होता. तेव्हा घाबरगुंडी उडालेल्या त्या मुलांनी थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेव्हा खरात विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्या काळात कुठलीही तक्रार थेट स्टेशन डायरीला नॉदली जायची नाही. साध्या कोऱ्या कागदावर तक्रार नोंदली जायची.
advertisement
या प्रकारानंतर अटक होण्याच्या भीतीने खरातने त्यावेळी आपल्या लोकप्रतिनिधीसोबत संपर्क साधून या भानगडीतून वाचवण्याची विनंती केली होती. तेव्हा संबंधित नेत्याने आपल्या एका कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात पाठवून फिर्याद फाडून टाकण्याची कामगिरी दिली होती. एवढंच नव्हे तर आरोपी खरातने पुढे याच क्लास चालकाला क्लासमधीलच एका तरुणीबरोबर दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला होता. क्लासचालकाने तसा विवाह देखील केला होता, अशी आठवण अनेक नाशिककर सांगत असल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
कुत्रा कापला, रक्ताळलेली रात्र, क्लास चालकाचा विद्यार्थिनीसोबत.., अशोक खरातचा आणखी एक अघोरी कांड!







