advertisement

Ashok Kharar Property : अशोक खरातच्या १५०० कोटींच्या साम्राज्याची पाळंमुळं खोदली, बघा कुठे कुठे आहे प्रॉपर्टी, पाहा यादी

Last Updated:

Ashok Kharat Property : वघ्या १०-१२ वर्षांत खरातने तब्बल १५०० कोटी रुपयांची माया जमवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक सायबर विभागाने आता 'नॅटग्रीड' (NATGRID) या शक्तिशाली ॲप्लिकेशनच्या साहाय्याने खरातच्या बँक खात्यांचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे.

अशोक खरातच्या १५०० कोटींच्या साम्राज्याची पाळंमुळं खोदली, बघा कुठे कुठे आहे प्रॉपर्टी, पाहा यादी
अशोक खरातच्या १५०० कोटींच्या साम्राज्याची पाळंमुळं खोदली, बघा कुठे कुठे आहे प्रॉपर्टी, पाहा यादी
नाशिक: नाशिकमधील वादग्रस्त 'भोंदू' अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा तपास आता त्याच्या अफाट संपत्तीकडे वळला आहे. अवघ्या १०-१२ वर्षांत खरातने तब्बल १५०० कोटी रुपयांची माया जमवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक सायबर विभागाने आता 'नॅटग्रीड' (NATGRID) या शक्तिशाली ॲप्लिकेशनच्या साहाय्याने खरातच्या बँक खात्यांचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे.

राजकारणी आणि बड्या अधिकाऱ्यांचे 'वरदहस्त'?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने हे १५०० कोटींचे साम्राज्य एकट्याने उभे केलेले नाही. यात अनेक बडे सरकारी अधिकारी आणि बड्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याची दाट शक्यता आहे. या 'बड्या' मंडळींच्या मदतीनेच खरातने अल्पावधीत इतकी मोठी मालमत्ता जमवली. पोलीस आता या 'बॅकएंड' सपोर्टरचा शोध घेत आहेत.

नॅटग्रीडने उघडले आर्थिक गुपित

advertisement
सायबर विभागाने खरातच्या सर्व बँक व्यवहारांची माहिती 'फास्टट्रॅक' स्वरूपात मिळवण्यासाठी नॅटग्रीडकडे पत्रव्यवहार केला होता. या माहितीच्या आधारे खरातची प्रॉपर्टी कुठे-कुठे आहे, याचे कच्चे आराखडे तयार करण्यात आले आहेत. खरातने जमवलेली ही संपत्ती केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून, ती इतर शहरांतही पसरल्याचा संशय आहे.

लक्झरी लाईफ अन् राजवाड्यासारखं फार्महाऊस

खरातचे राहणीमान एखाद्या राजासारखे होते. त्याची विलासी जीवनशैली आणि शहराबाहेर असलेले त्याचे विशाल फार्महाऊस पाहूनच त्याच्या संपत्तीचा अंदाज येतो. ओकस प्रॉपर्टीजच्या नावाखाली चालणाऱ्या या व्यवहारांतून कोट्यवधींची काळी माया पांढरी केली गेली का? याचा तपासही यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
advertisement

>> अशोक खरातच्या कुठं आहेत मालमत्ता

पोलिसांनी अशोक खरातकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून त्याची मालमत्ता कोठे कोठे आहे याची माहिती जमा करण्यात आली.
> मिरगांव ता. सिन्नर जि. नाशिक येथे ३३ एकर जमीन स्वतःचे नांव
> मिरगांव ता. सिन्नर येथे फार्महाऊस
> पाथर्डी गांव, गौळाणे गांव ता. जि. नाशिक येथे १० एकर जमीन
advertisement
> सिन्नर ता.सिन्नर जि. नाशिक येथे ६ एकर जमीन
> शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे ४.५ एकर जमीन स्वतःचे नांवे
> काकडी ता. राहाता जि. अहिल्यानगर (शिर्डी विमानतळ) येथे ५.५ एकर जमीन.
> पाथर्डी फाटा नाशिक येथे ८०० स्क्वेअर फुट चा १ प्लॉट
> ओझर जि. नाशिक येथे ४ गुंठे चे ३ प्लॉट.
advertisement
> आडगांव ता.जि. नाशिक येथे ५ गुंठे चा प्लॉट.
> पनवेल नवी मुंबई येथे ४० गुठे प्लॉट.
> कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफीस १८० स्क्वेअर फुट.
> संगमनेर जि. अहिल्यानगर येथे मुलगी श्रृष्टीचे नावावर ११ गुंठे प्लॉट.
> पुणे येथे मुलीच्या नांवावर प्लॉट.
> कर्मयोगी नगर, नाशिक येथे बंगला.
> शिर्डी, ता. राहाता नि. अहिल्यानगर येथे पार्टनरशीपमध्ये साई सिल्वर औक मंगल कार्यालय
advertisement
> सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक येथे ५ जणांमध्ये मिळून ६ एकर जमीन,
> स्वतःकडे १२ तोळे सोने
> पत्नीकडे २० तोळे सोने
> पत्नीच्या नांवे डीमॅट अकाउंट १ ते २ लाख गुंतवणुक
> एकूण बँक खाते ५ असल्याचे समोर आले आहे. आयसीआयसीआय, युनियन बँक, सारस्वत, एसबीआय, विश्वास को-ऑप आदी बँकांमध्ये खाती असल्याची माहिती.
advertisement
अशाप्रकारे अंदाजे एकूण ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य असणारी संपत्तीचा छडा पोलिसांना लावता आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharar Property : अशोक खरातच्या १५०० कोटींच्या साम्राज्याची पाळंमुळं खोदली, बघा कुठे कुठे आहे प्रॉपर्टी, पाहा यादी
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement