नाशिकमध्ये 2 दिवस खास ‘एअर शो’, वाहतुकीत मोठे बदल, हा रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: नाशिकच्या पर्यटनात भर घालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गात बदल करण्यात आले आहेत.
नाशिक: भारतीय वायूसेना आणि नाशिक जिल्हा प्रशासन यांच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. 22) व शुक्रवारी (दि. 23)रोजी ‘सूर्यकिरण एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात हा भव्य शो होणार आहे. या सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी गंगापूर रोडवरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
नाशिकमधील आनंदवल्ली ते हरसूलपर्यंतचा मार्ग पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीचे निर्बंध आणि वेळ
दोन्ही दिवशी सकाळी 8:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. यामध्ये एसटी बसेस, सिटिलिंक, खासगी बसेस, अवजड मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक आणि काळी-पिवळी टॅक्सींचा समावेश आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
advertisement
असे असतील पर्यायी मार्ग
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी अधिसूचनेद्वारे खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
मार्ग 1: आनंदवल्ली गावातून उजवीकडे वळून चांदशी पूल – मुंगसरा फाटा – दुगाव मार्गे वाहने मार्गस्थ होतील.
advertisement
मार्ग 2: गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलसमोरील गेटकडून सावरकरनगर मार्गे बापू पुलावरून पुढे प्रवास करता येईल.
दरम्यान, नाशिकच्या पर्यटनात भर घालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये 2 दिवस खास ‘एअर शो’, वाहतुकीत मोठे बदल, हा रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?







