नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?

Last Updated:

Nashik Chennai Expressway: नाशिकमधून नवीन ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे होत असून हा मार्ग महत्त्वाची बंदरे आणि तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद आणि सोपाई होईल.

नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?
नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?
नाशिक: केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत प्रस्तावित असलेल्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता हा प्रकल्प नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे म्हणून ओळखला जाईल. नाशिक ते सुरतदरम्यानचा नियोजित मार्ग रद्द करण्यात आला असून, हा महामार्ग आता नाशिकपासून थेट चेन्नईपर्यंत धावणार आहे.
चेन्नई आणि वाढवण बंदरांची कनेक्टिव्हिटी
या एक्स्प्रेस वेची सर्वात मोठी खासियत म्हणजे, नाशिकहून पुढे तो पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाढवण बंदराला जोडला जाईल. यामुळे दक्षिणेकडील चेन्नई आणि महाराष्ट्रातील वाढवण ही दोन मोठी बंदरे एका प्रस्तावित एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून थेट एकमेकांशी जोडली जाणार आहेत.
advertisement
नाशिक ते अक्कलकोट: प्रवास केवळ 4 तासांत
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोट या 374 किलोमीटर लांबीच्या 6-लेन एक्स्प्रेस वेचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या रस्त्याने हे अंतर 524 किलोमीटर असून, प्रवासासाठी सुमारे 9 तास लागतात. मात्र, या नवीन मार्गामुळे हे अंतर 150 किलोमीटरने कमी होऊन केवळ 374 किलोमीटर होईल, तर प्रवासाचा वेळ 9 तासांवरून केवळ 4 तासांवर येणार आहे.
advertisement
हा महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर विकसित केला जाईल.
नाशिक-तिरुपती अंतर निम्म्यावर
हा संपूर्ण एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रेदेखील जवळ येणार आहेत. सध्या रस्त्याने नाशिक ते तिरुपती हे अंतर कापायला 22 ते 23 तास लागतात, पण प्रस्तावित एक्स्प्रेस वेमुळे हा वेळ निम्म्यावर येऊन 11 ते 12 तासांवर येईल.
advertisement
असा असेल नाशिकमधील 'कनेक्टिंग बिंदू'
नाशिकमध्ये हा महामार्ग मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावच्या ट्रक टर्मिनसजवळ कनेक्ट होईल.
गोंदे दुमाला येथे हा महामार्ग 'तवा (वाढवण) नाशिक एक्स्प्रेस वे'ला जोडून वाढवण बंदरापर्यंत कनेक्ट होईल.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे तो 'समृद्धी महामार्गा'ला जोडला जाईल.
नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि 70 गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी 195 हेक्टर भूसंपादन केले जाईल.
advertisement
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांना जोडणार आहे. मार्गावरील प्रमुख शहरांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि चेन्नई यांचा समावेश असेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis: शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

View All
advertisement