Nashik Water: सिन्नरकरांसाठी महत्त्वाची बातमी! 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार पाणी पुरवठा; नेमकं कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सिन्नरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल महिन्यामध्ये चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा बंद राहण्यामागील नेमकं कारण काय? जाणून घेऊया...
नाशिक: सिन्नर नगरपरिषदेने नागरिकांना पाण्याविषयी फार मोठा दिलासा दिलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ग्रामदेवतेची यात्रा असल्यामुळे सिन्नरकरांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. येत्या 1 एप्रिलला ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या भैरवनाथ महाराजांची यात्रा आहे. या यात्रेमुळे नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत बुधवार 25 मार्च 2026 पासून 01 एप्रिल 2026 पर्यंत सिन्नरमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
गावकऱ्यांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय भैरवनाथ महाराजांच्या यात्रेमुळे घेतला आहे. येत्या 1 एप्रिलला भैरवनाथ महाराजांची यात्रा आहे, त्यामुळे नगर परिषदेने नागरिकांना दिलासा दिलेला आहे. यात्रेनिमित्त गावामधील नागरिकांच्या घरी नातेवाईक आणि मित्रमंडळी येत असतात. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आणि मुख्याधिकारी अभिजीत देशमुख यांनी हा पाण्यासंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला. यात्रेवेळी जरीही सुरळीत पाणी पुरवठा होणार असला तरीही त्यानंतर मात्र चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
यात्रेवेळी पाणी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जलसाठे, वितरण व्यवस्था आणि दाब नियंत्रणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. काही भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. यात्रेनंतर म्हणजेच 1 एप्रिलनंतर पुढचे चार दिवस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. शिवडे गावाच्या हद्दीतून जाणारी कडवा जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम घेतले जाणार आहे. त्यामुळे यात्रेनंतर पुढचे तीन ते चार दिवस बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे काही दिवस गावकऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच पुरेसा पाणी पुरवठा भरून ठेवण्याची माहिती नगरपरिषदेने नागरिकांना केली आहे.
advertisement
शिवडे ग्रामपंचायतीच्या इमारतीखालून गेलेली 50 मीटर लांबीची सिन्नर नगरपालिकेची मुख्य जलवाहिनी स्थलांतरत करण्यात येणार आहे. या कामासाठी 16.89 लाखांचा खर्च लागणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. या काळात पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहिल. पाईपलाईनचं काम आटोपल्यानंतर पुन्हा एकदा एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 3:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Water: सिन्नरकरांसाठी महत्त्वाची बातमी! 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार पाणी पुरवठा; नेमकं कारण काय?










