advertisement

ठाणे पोलिसांनी सापळा लावला, तीन ‘पेडलर’ गळाला, धक्कादायक कांड समोर, 4 कोटी...

Last Updated:

Thane News: ठाणे पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. आता तिसरे नाव देखील समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी सापळा लावला, तीन ‘पेडलर’ गळाला, धक्कादायक कांड समोर, 4 कोटी...
ठाणे पोलिसांनी सापळा लावला, तीन ‘पेडलर’ गळाला, धक्कादायक कांड समोर, 4 कोटी...
ठाणे: राज्यात काही ठिकाणी अमली पदार्थांचा विळखा वाढताना दिसतोय. अशातच ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चरई परिसरातून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना दोघांना अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून तब्बल 4 कोटी 40 लाख किमतीचे 2 किलो 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
ठाण्यातील चरई परिसरात दोघेजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार होते. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार 23 मार्च रोजी सायंकाळी 7.10 च्या सुमारास सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये 26 वर्षीय सोहेल दिलीप खान (कोपरी, ठाणे) आणि 21 वर्षांच्या रोहित विलास सितापुरे (रा. उल्हासनगर) यांना अटक करण्यात आली.
advertisement
दरम्यान अटक केलेल्या दोघांच्या ताब्यात एकूण 2 किलो 62 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळून आले. 4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये किमतीचे हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या चौकशीतून त्यांच्या आणखी एका साथीदाराचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी 23 वर्षीय तिसरा आरोपी राजेश हडावले (कोपरी, ठाणे) याला देखील अटक केली. आरोपींना न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
ठाणे पोलिसांनी सापळा लावला, तीन ‘पेडलर’ गळाला, धक्कादायक कांड समोर, 4 कोटी...
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement