Ekadashi March 2026: मार्च महिन्याची शेवटची एकादशी कधी? अचूक तिथी 28 की 29 मार्च; पूजेचा शुभ मुहूर्त, विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi Puja 2026: मार्च महिन्यातील दुसरी आणि शेवटची एकादशी कामदा एकादशी असेल. या एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूचा अनंत आशीर्वाद मिळतो, त्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी ही एकादशी कधी आहे, कशी साजरी करायची याविषयी जाणून घेऊ.
मुंबई : हिंदू धर्मात अनेक धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात, यामध्ये दर महिन्याला दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. मार्च महिन्यातही दोन एकादशी आहेत, त्यापैकी पहिली 15 मार्च रोजी होती आणि दुसरी मार्चच्या शेवटी आली आहे. मार्च महिन्यातील दुसरी आणि शेवटची एकादशी कामदा एकादशी असेल. या एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूचा अनंत आशीर्वाद मिळतो, त्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी ही एकादशी कधी आहे, कशी साजरी करायची याविषयी जाणून घेऊ.
भारतीय पंचांगामध्ये प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील एकादशीला विशिष्ट नावे देण्यात आली आहेत. या प्रत्येक एकादशीसंबंधी कथा सांगण्यात आलेल्या आहेत . ‘एकादशी माहात्म्य ‘ या ग्रंथामध्ये या सर्व कथा आपणास पहाता येतील. चैत्र =शुक्ल पक्ष - कामदा एकादशी. कृष्ण पक्ष - वरूथिनी एकादशी. वैशाख = शुक्ल पक्ष - मोहिनी एकादशी. कृष्ण पक्ष - अपरा एकादशी. ज्येष्ठ = शुक्ल पक्ष - निर्जला एकादशी. कृष्ण पक्ष - योगिनी एकादशी. आषाढ = शुक्लपक्ष - देवशयनी एकादशी. कृष्ण पक्ष - कामिका एकादशी. श्रावण= शुक्ल पक्ष - पुत्रदा एकादशी. कृष्ण पक्ष - अजा एकादशी. भाद्रपद = शुक्ल पक्ष- परिवर्तिनी एकादशी. कृष्ण पक्ष - इंदिरा अकादशी. आश्विन = शुक्ल पक्ष - पाशांकुशा एकादशी.
advertisement
कृष्ण पक्ष - रमा एकादशी. कार्तिक = शुक्ल पक्ष - प्रबोधिनी एकादशी. कृष्ण पक्ष - उत्पत्ती एकादशी. मार्गशीर्ष = शुक्ल पक्ष - मोक्षदा एकादशी. कृष्ण पक्ष - सफला एकादशी. पौष = शुक्ल पक्ष - पुत्रदा एकादशी. कृष्ण पक्ष - षट्तिला एकादशी. माघ= शुक्ल पक्ष - जया एकादशी. कृष्ण पक्ष - विजया एकादशी. फाल्गुन = शुक्ल पक्ष - आमलकी एकादशी. कृष्ण पक्ष - पापमोचनी एकादशी. प्रत्येक एकादशीसंबंधी कथा सांगितलेल्या आहेत.
advertisement
मार्च 2026 मध्ये एकादशी - मार्च महिन्यातील शेवटची एकादशी 29 तारखेला साजरी केली जाईल. ही कामदा एकादशी असेल. पंचांगानुसार, रामनवमीनंतर साजरी होणाऱ्या हिंदू नववर्षातील ही पहिली एकादशी आहे.
advertisement
कामदा एकादशी मुहूर्त -
लाभ - समृद्धी - सकाळी 09:20 ते सकाळी 10:53
अमृत - उत्तम - सकाळी 10:53 ते दुपारी 12:26
शुभ - उत्तम - दुपारी 01:59 ते दुपारी 03:32
शुभ - उत्तम - सायंकाळी 06:37 ते रात्री 08:04
अमृत - उत्तम - रात्री 08:04 ते रात्री 09:31
advertisement
एकादशी व्रताचे महत्त्व - सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचं व्रत-पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि धन व समृद्धी प्राप्त होते. शिवाय मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होतो. काही जण पाण्याशिवाय उपवास करतात, तर काही जण फळे खाऊन हे व्रत पाळतात. बरेच लोक दिवसातून एकदाच भोजन करून हा उपवास पाळतात. या उपवासादरम्यान, शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 2:50 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ekadashi March 2026: मार्च महिन्याची शेवटची एकादशी कधी? अचूक तिथी 28 की 29 मार्च; पूजेचा शुभ मुहूर्त, विधी








