दिवाळी फराळाची नाशिकमध्ये मोठी मागणी, मालपाठकर बंधूंचे स्टॉल हिट

Last Updated:

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आपली असून सर्वांच्या घरात गोड धोडाचे पदार्थ बनत असतात. तर काही लोक हे सर्व पदार्थ बाहेरून खरीदी करण्यास आता पसंती देत असतात.

+
१९

१९ वर्षांपासून बनवत आहे मालपाटकर बंडू पारंपरिक भाजणीची चकली.

कुणाल दंडगव्हाळ - प्रतिनीधी, नाशिक : दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे, सर्वत्र लोकांची दिवाळीच्या खरेदीसाठी लगबग सुरु आहे. नशिकमध्ये ही अशीच परिस्थीती आहे, सर्वत्र दिवाळीच्या फराळाची गडबड सुरू झाली आहे. घरोघरी लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी अशा गोड पदार्थांची लगबग दिसून येत आहे. घराघरात तयार होणारा हा पारंपरिक फराळ सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पण सध्या, बदलत्या जीवनशैलीमुळे काही लोक याप्रकारे फराळ घरी न बनवता बाजारातून तयार घेण्यास प्राधान्य देत आहेत.
advertisement
अशातच, नाशिकमध्ये गेली १९ वर्षं पारंपरिक फराळ तयार करून देणारे मालपाठकर बंधू त्यांच्या खास फराळ स्टोलसह पुन्हा तयार आहेत. पंचवटीतील अशोक स्तंभाजवळील यांचे “मालपाठकर फराळ सेंटर” दिवाळीत खास लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या पारंपरिक भाजणीच्या कुरकुरीत चकलीची प्रचंड मागणी असते. ही चकली ते पारंपरिक पद्धतीने आपल्या ग्राहकांसमोर बनवतात, ज्यामुळे ताजेपणा आणि गुणवत्तेची हमी मिळते.
advertisement
दिवाळीच्या काळात, यांच्याकडे चिवडा, बेसन आणि बुंदीचे लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंजी आणि इतर पारंपरिक पदार्थ देखील उपलब्ध असतात. ग्राहकांना गरमागरम, आपल्या डोळ्यांसमोर बनलेले पदार्थ मिळावेत याची ते विशेष काळजी घेतात. लोकांना आवडत असलेल्या या पदार्थांच्या चवीमुळे दिवाळीत त्यांच्या स्टोलवर गर्दी वाढत जाते.
मालपाठकर बंधूंच्या मते, दिवाळीच्या काही आठवडे आधीच ते स्टोल सुरू करतात आणि चवीत कोणतीही तडजोड न करता, उच्च दर्जाचे पदार्थ ग्राहकांना पुरवतात. ग्राहकांच्या चवीला खरा फराळ मिळावा म्हणून ते पारंपरिक रेसिपींचा वापर करतात. शिवाय, कोणत्याही पदार्थामध्ये कोणाला त्रास होणार नाही, यासाठी ते अतिरिक्त खबरदारी घेतात. त्यामुळे, दिवाळीसाठी नाशिकमध्ये खास फराळ घेण्यासाठी मालपाठकर बंधूंच्या स्टोलवर जाणे हा एक अनिवार्य भाग बनला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
दिवाळी फराळाची नाशिकमध्ये मोठी मागणी, मालपाठकर बंधूंचे स्टॉल हिट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement