स्पायडरमॅनचं भूतं चढलं डोक्यावर, ऑटोमागे तरुणाचा जीवघेणा स्टंट, नवी मुंबईतील VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवी मुंबईत तरुणाने रिक्षावर जीवघेणा स्टंट केला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईची मागणी केली. अभिनेत्री नाझमीन सुलदेने मर्सिडीज-बेंझवर डान्स केला, बाइकवरील कपलचा व्हिडीओ चर्चेत.
नवी मुंबई: गाडीवर, बाईकवर स्टंटचे व्हिडीओ पाहिले असतील पण पठ्ठ्यानं थेट रिक्षावरच स्टंट केला आहे. रिक्षाच्या मागे उभं राहून पठ्ठ्यानं स्टंट केला. हायस्पीडनं जाणाऱ्या ऑटोमागे स्पायडरमॅनसारखं उभं राहून प्रवास करताना तरुण दिसला. जीवघेणा स्टंट पाहून लोकांनाही धक्का बसला आहे. या स्टंटची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी नवी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.
ही धक्कादायक घटना, नवी मुंबईत घडली आहे. व्हिडिओमध्ये, एक तरुण हाय-स्पीड ऑटोमागे उभा आहे, ऑटोचा मागचा भाग धरून स्पायडरमॅन सारखा स्टंट करत आहे. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय तो अशापद्धतीनं उभा आहे. रिक्षा चालक देखील वेगानं गाडी चालवताना दिसत आहे. नियमांना धाब्यावर बसवून अशा पद्धतीने स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी युजर्स करत आहेत.
advertisement
जीवाची पर्वा न करता अशापद्धतीनं धोकादायक स्टंट करणं आणि इतर प्रवाशांचा जीवही धोक्यात घालणं गुन्हा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकाची देखील चौकशी केली जात आहे. ही पहिली घटना नाही, अलिकडेच नवी मुंबईतून आणखी एक स्टंट प्रकरण समोर आले आहे.
advertisement
अभिनेत्री नाझमीन सुलदे चालत्या मर्सिडीज-बेंझच्या बोनेटवर उभे राहून डान्स करताना दिसली. या स्टंटबाजीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे बाइकवरील कपलचा व्हिडीओ देखील तुफान चर्चेत आला आहे. बाइकवर बसून कपल अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ देखील चर्चेत आला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्पायडरमॅनचं भूतं चढलं डोक्यावर, ऑटोमागे तरुणाचा जीवघेणा स्टंट, नवी मुंबईतील VIDEO