Navratrotsav 2025 : नवरात्रोत्सवाला काही दिवसच शिल्लक, देवीच्या मुर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मुर्तीकारांची लगबग
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
गणेशोत्सवानंतर बघता बघता शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीचा उत्सव देखील भारतात अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवानंतर बघता बघता शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीचा उत्सव देखील भारतात अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यानुसार, यंदा 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. यामुळे मूर्तिकरागिराची शेवटचा हात फिरवण्याची लगबग सध्या सुरू आहे सध्या राज्य शासनाने पीओपीच्या मूर्तीवरील बंदी उठली असून मूर्तिकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के ची वाढ झाल्यामुळे मूर्तीच्या दरामध्येही 20 ते 25 टक्के ची वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले आहेत सध्या मूर्तिकार शेवटचा हात फिरवताना देवीच्या डोळ्यांना आकर्षक बनवत आहे.देवीचे डोळे गाल ,ओठ याच्याकडे बारकाईने बघून रंग देत आहे. भाविकांनी आतापासूनच मुर्ती बुकिंग केली असून, साडेतीन फुटापासून ते सात फुटापर्यंत सध्या कारागीर मूर्ती बनवत आहे आणि हसऱ्या आणि गोल चेहऱ्याच्या मुर्त्यांना सध्या मागणी आहे सध्या.
advertisement
सध्या अडीच तीन फुटांच्या मूर्तीला मोठी मागणी आहे त्यासोबत 60% मुर्त्या आधीच भाविकांनी बुक करून ठेवलेले आहेत. पराज्यामधून देखील मूर्ती या विक्रीसाठी आलेला आहेत पण आपल्या शहराच्या मूर्ती तयार होतात त्या मूर्तींना मोठी मागणी देखील आहे. नागरिकांनी देवीच्या चेहऱ्यावरची फिनिशिंग बघून त्यासोबतच डोळे बघून मुर्तिया बुक करत असतात. जेवढे देखील डोळे तेवढी मूर्ती छान होती असं देखील सांगितलं आहे. असं मूर्तिकार गणेश बगले, म्हणाले आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
September 20, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratrotsav 2025 : नवरात्रोत्सवाला काही दिवसच शिल्लक, देवीच्या मुर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मुर्तीकारांची लगबग