राष्ट्रवादी एकत्र, हर्षवर्धन पाटलांची लेक घड्याळावर लढणार, भरणेंचा लेकही घड्याळावर रिंगणात, मामा-भाऊंचं मनोमीलन!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कट्टर प्रतिस्पर्धी दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील सोबत येणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मुलांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
इंदापूर, पुणे : सर्वशक्तिमान भाजपसमोर 'बटेंगे तो कटेंगे' हे लक्षात आल्यानंतर 'एक है तो सेफ है' चा अंतर्गत नारा देऊन दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन झाले आहे. मनोमीलनाचा पहिला प्रयोग महापालिका निवडणुकीवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झाला. परंतु निवडणुकीच्या अगदी तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने मतदारांमध्ये संभ्रम होऊन मतांच्या टक्केवारीत चांगलीच घट झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड खरे तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. परंतु यंदा राष्ट्रवादीची जोरदार पिछेहाट झाली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महापालिकेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित निवडणुकांना सामोरे जाण्याचे ठरवले आहे. इंदापुरात काय होणार, कट्टर प्रतिस्पर्धी दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील सोबत येणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मुलांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इंदापुरात प्रवीण माने यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांचे तगडे आव्हान असेल.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत आता दिग्गज उमेदवारांच्या एन्ट्री होऊ लागली आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या, इंदापूर तालुक्यातील बावडा गटामधून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला. त्यांचे बंधू राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि चुलते भैयासाहेब पाटील यांनी अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
advertisement
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अर्ज दाखल केला. बोरी पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. भरणे यांच्यानंतर सक्रिय राजकारणात येणारी ही त्यांची दुसरी पिढी आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या आहेत. मी अंकिता पाटील यांच्या प्रचाराला जाईल, असे दत्ता भरणे यांनी सांगितले. तर मी देखील दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या प्रचाराला जाणार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादी एकत्र, हर्षवर्धन पाटलांची लेक घड्याळावर लढणार, भरणेंचा लेकही घड्याळावर रिंगणात, मामा-भाऊंचं मनोमीलन!










