VIDEO : नजरेचं पातं लवायच्या आत संजूचा कॅच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम

Last Updated:

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट गमावून 238 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरूवात खराब झाली होती.

 sanju samson takes brilliant catch
sanju samson takes brilliant catch
India vs New Zealand 1st t20i : नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट गमावून 238 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरूवात खराब झाली होती. कारण पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर डेवॉन कॉन्वेची विकेट पडली आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर संजू सॅमसनने विकेट मागून भन्नाट कॅच पकडली आहे. विशेष म्हणजे त्याने ही कॅच नजरेचं पातं लवायच्या आत घेतली आहे.त्यामुळे या कॅचची प्रचंड चर्चा रंगली आहे. या कॅचचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरुवात खराब झाली होती. कारण भारताच्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अर्शदिप सिहने डेवॉन कॉन्वेची विकेट घेतली होती. त्याचं झालं असं की अर्शदिपने टाकलेला बॉल डेवॉन कॉन्वेच्या बॅटीला कड लागून विकेटमागे गेला.यावेळी विकेटकिपर संजू सॅमसनने डाव्या दिशेने उडी मारून कॅच घेतली आहे.विशेष म्हणजे त्याने ही कॅच अवघ्या 0.68 सेंकदात घेतली आहे. या अर्थ त्याने ही कॅच घ्यायला 1 सेकंद देखील लावला नाही.म्हणजेच एक वेळच्या डोळेझाक करणाऱ्या जितका वेळ लागतो तितक्या सेकंदात त्याने ही कॅच घेतली आहे.त्यामुळे या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
advertisement
पहिल्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने रचिन रविंद्रला कॅच आऊट केले होते होते.त्यामुळे अवघ्या 1 धावांवर न्यूझीलंडचे 2 विकेट पडले होते.,त्यानंतर ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडचा डाव सावरला आहे.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सूरूवात धडाकेबाज झाली होती. भारताकडून अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली होती. तर रिंकु सिंहने 20 बॉल 44 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 238 धावा केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : नजरेचं पातं लवायच्या आत संजूचा कॅच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement