IND vs NZ : कॉमेंटेटर मुरली कार्तिकने नागपूरच्या स्टेडिअमची चुक काढली, रिंकूने दोन शब्दात विषय संपवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या या विजयानंतर कॉमेंटेटर मुरली कार्तिकने रिंकु सिंहला नागपूरच्या स्टेडिअमवरील नियोजनावर प्रश्न विचारला होता. मात्र रिंकु सिंहने एका वाक्यात विषय संपवला होता.
India vs New Zealand 1st t20i : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्याच टी20 सामन्यात भारताने 7 विकेट गमावून 238 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड फक्त 7 विकेट गमावून 190 धावाच करू शकली होती. त्यामुळे भारताने हा सामना 48 धावांना जिंकला होता. भारताच्या या विजयानंतर कॉमेंटेटर मुरली कार्तिकने रिंकु सिंहला नागपूरच्या स्टेडिअमवरील नियोजनावर प्रश्न विचारला होता. मात्र रिंकु सिंहने एका वाक्यात विषय संपवला होता.
भारताच्या विजयानंतर कॉमेंटेटर मुरली कार्तिकने रिंकु सिंहशी बातचीत केली होती. यावेळी रिंकु सिंह म्हणाला, मी संघात आत-बाहेर होत असल्यामुळे माझ्यावर दबाव होता. एकेरी धावा काढायच्या आणि नंतर मोठे फटके मारायचे, अशी योजना होती. तसेच शेवटपर्यंत खेळायचे होते. मी तेच केले. जीजी सरांनी मला माझा इरादा कायम ठेवण्यास सांगितले होते, असे रिंकु सिंहने सांगितले.
advertisement
तसेच नागपूरच्या मैदानात कमी लाईटस होत्या म्हणून तुझी कॅच ड्रॉप झाली होती का? असा सवाल मुरली कार्तिकने रिंकूला विचारला होता. यावर रिंकु म्हणाला, मैदानातील लाईटमुळे कोणतीच अडचण होत नव्हती.माझ्याकडून फक्त एक झेल सुटला आणि काळजी करण्यासारखे काही नाही,असेही त्याने पुढे सांगितला.आम्हाला हा आत्मविश्वास आणि ही गती विश्वचषकात पुढे घेऊन जायची आहे आणि तो जिंकायचा आहे,असेही रिंकूने पुढे सांगितले.
advertisement
कसा रंगला सामना?
भारताने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरूवात खराब झाली होती. कारण न्यूझीलंडने 1 धावांवर 2 विकेट पडले होते. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडचा डाव सावरला होता. ग्लेन फिलिप्सने 40 बॉलमध्ये 78 धावांची खेळी केली होती. त्याच्यासोबत मार्क चॅपमनने 39 धावांची खेळी केली. या बळावर न्यूझीलंड फक्त 190 धावाच करू शकली होती.त्यामुळे त्यांचा 48 धावांनी पराभव झाला.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावा ठोकल्या होत्या. भारताकडून अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली होती.शेवटी रिंकु सिंहने 20 बॉल 44 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 237 धावा केल्या होत्या.न्यूझीलंडकडून जॅकॉब डफी आणि कायली जेमिन्सने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. तर क्रिस्टन क्लार्क, इश सोढी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 11:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : कॉमेंटेटर मुरली कार्तिकने नागपूरच्या स्टेडिअमची चुक काढली, रिंकूने दोन शब्दात विषय संपवला









