advertisement

NCP Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का, मराठवाड्यातलं समीकरण बदलणार

Last Updated:

NCP Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतरही फोडाफोडीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

राज्यसभा निवडणुकीआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का, मराठवाड्यातलं समीकरण बदलणार
राज्यसभा निवडणुकीआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का, मराठवाड्यातलं समीकरण बदलणार
मनिष खरात, प्रतिनिधी, हिंगोली: राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतरही फोडाफोडीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आता हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिष दांडेगावकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षबदलामुळे हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

३०० गाड्यांचा ताफा आणि मोठे शक्तीप्रदर्शन

आतिष दांडेगावकर यांनी आज हिंगोलीत मोठे शक्तीप्रदर्शन केले. सुमारे ३०० हून अधिक गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. एका बड्या नेत्याच्या पुत्राने अशा प्रकारे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
advertisement

"वडिलांचे आशीर्वाद घेऊनच निर्णय"

यावेळी माध्यमांशी बोलताना आतिष दांडेगावकर म्हणाले की, "मी हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही. सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली असून, वडिलांचे (जयप्रकाश दांडेगावकर) आशीर्वाद घेऊनच मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे." त्यांच्या या विधानामुळे जयप्रकाश दांडेगावकर यांची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
advertisement

हिंगोलीच्या समीकरणांवर काय परिणाम?

आतिष दांडेगावकर हे हिंगोलीतील तरुण आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का, मराठवाड्यातलं समीकरण बदलणार
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement