advertisement

मंत्रि‍पदासाठी तुम्ही अशोक खरातला भेटल्या का? नीलम गोऱ्हेंनी घराण्याचा इतिहास सांगितला

Last Updated:

नीलम गोऱ्हे देखील मागच्या काळात मंत्रि‍पदासाठी खरात याला नाशिकच्या हॉटेलमध्ये येऊन भेटल्या होत्या, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला. त्यांच्या याच आरोपांना उत्तर देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली.

नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे
पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे राज्यातील ३९ आमदार त्यांचे भविष्य बघायला गेल्याचे पुढे येत आहे. यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही समावेश आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांचे खंडन नीलम गोऱ्हे यांनी केले. मी केलेल्या निरोपाच्या भाषणामुळे अनेकांना पोटदुखी झाली असून राजकारणातील हेतू साध्य न झाल्याने काहीजण आरोप करीत असल्याचा पलटवार त्यांनी केला तसेच पुरावे सादर करण्याचे आव्हानही दिले.
राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उठबस अशोक खरात याच्याकडे होती हे आता लपून राहिलेले नाही. नीलम गोऱ्हे देखील मागच्या काळात मंत्रि‍पदासाठी खरात याला नाशिकच्या हॉटेलमध्ये येऊन भेटल्या होत्या, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला. त्यांच्या याच आरोपांना उत्तर देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली.

माझ्यावर आई वडिलांच्या सुधारणावादी विचारांचा पगडा, मी बाबा बुवांना मानत नाही

advertisement
मी गेल्या पाच दशकापासून सामाजिक, राजकीय जीवनात सक्रीय आहे. माझी कारकीर्द स्वच्छ, पारदर्शक राहिली आहे. माझ्यावर माझे आई- बाबा आणि आजोबांचे सुधारणावादी संस्कारांचा पगडा आहे. मी कधीही कुठल्याही बाबाबुवांना भेटायला जात नाही, तो माझा स्वभाव नाही. मी प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व मानते. मला अशोक खरात याचे कार्यालय माहिती नाही, मी कशाला कुठे जाऊ? असा सवाल करीत आरोप करणाऱ्यांनी पुरावे देऊन बोलावे, असे आव्हान गोऱ्हे यांनी दिले.
advertisement

गेल्या ६ वर्षात मी नाशिकच्या त्या हॉटेलमध्येच गेली नाही, मला खरातचे ऑफिसही माहिती नाही

तसेच मी उपसभापती असल्याने माझ्या दौऱ्याचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यामुळे मी कुठे कुठे गेले, याचे फोटो व्हिडीओज समाज माध्यमांवर उपलब्ध असतात. मी आजवर कुठली ही गोष्ट लपवलेले नाही. पण खरातला मी भेटलेली नाही. गेल्या सहा वर्षात नाशिकमधील संबंधित हॉटेलमध्ये मी कधीच गेले नाही, असे सांगताना माझ्या विरोधातील केलेले सर्व आरोप कपोलकल्पित असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाले.
advertisement

तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात कायदेशीर मार्ग अवलंबणार

पुणे महापालिकेत काहींना यश आले नाही. त्यामुळे काही जण निराश झाले आहेत. त्याच निराशेतून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, असे सुषमा अंधारे यांचे नाव न घेता गोऱ्हे यांनी टीका केली.
तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी कायदेशीर मार्ग अवलंबेन. एसआयटी चौकशी सुरू आहे, ज्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
advertisement

कारवाई सुरू असताना अशोक खरातवर का बोलल्या नाहीत?

कारवाई सुरू असताना अशोक खरातवर का बोलल्या नाहीत? असा प्रश्न मला अनेक जण विचारीत आहेत. परंतु अधिवेशन सुरू असताना बोलले असते तर चौकशीत हस्तक्षेप झाला असता, असे कारण नीलम गोऱ्हे यांनी दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्रि‍पदासाठी तुम्ही अशोक खरातला भेटल्या का? नीलम गोऱ्हेंनी घराण्याचा इतिहास सांगितला
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement