IPL 2026 : 'आता या टीममधूनच रिटायर व्हायचं...', हार्दिक हट्टाला पेटला, मुंबईच्या स्टारकडून शब्द घेतला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला आहे. केकेआरने दिलेलं 221 रनचं आव्हान मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमावून पार केलं.
मुंबई : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला आहे. केकेआरने दिलेलं 221 रनचं आव्हान मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमावून पार केलं. रोहित शर्मा आणि रेयान रिकलटन यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने एवढं मोठं आव्हान यशस्वी पार केलं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. तसंच 2012 नंतर मुंबईने पहिल्यांदाच मोसमाची पहिली मॅच जिंकली आहे.
रोहित शर्मा आणि रेयान रिकलटन यांनी मुंबईला विक्रमी विजय मिळवून दिला असला तरी या सामन्याचं प्लेअर ऑफ द मॅच शार्दुल ठाकूरला देण्यात आलं. शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 3 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला शब्द दिला आहे.
2010 चा नेट बॉलर, 2026 मध्ये हिरो
शार्दुल ठाकूर 2010 साली पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये नेट बॉलर म्हणून आला. आता 16 वर्षांनंतर आयपीएल 2026 मध्ये शार्दुल मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला. शार्दुलने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फिन ऍलन, कॅमरून ग्रीन आणि अजिंक्य रहाणे या केकेआरच्या तिन्ही टॉप ऑर्डरच्या खेळाडूंची विकेट घेतली, ज्यामुळे केकेआरला 250 रनपर्यंत मजल मारता आली नाही.
advertisement
आता मुंबई इंडियन्ससोबतच राहणार शार्दुल
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या कामगिरीबद्दल शार्दुल ठाकूरचं कौतुक केलं आहे. 'शार्दुलकडून या मोसमात आम्हाला खूप अपेक्षा आहेत. तू बऱ्याच फ्रॅन्चायजींकडून खेळलास आता पुढच्या पूर्ण करिअरमध्ये मुंबई इंडियन्ससोबतच राहायचं, हे मी शार्दुलला सांगितलं आहे. तो परिस्थितीला न घाबरणारा धाडसी खेळाडू आहे', असं हार्दिक पांड्या म्हणाला.
advertisement
मुंबईसोबत शार्दुलचा पहिला मोसम
शार्दुल ठाकूरचा मुंबई इंडियन्ससोबतचा हा पहिलाच मोसम आहे. याआधी शार्दुल आयपीएलच्या एकूण 5 टीमकडून खेळला आहे, ज्यात चेन्नई सुपरकिंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजाएंट्स आणि केकेआर यांचा समावेश आहे. आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने लखनऊसोबत ट्रेड करून शार्दुल ठाकूरला टीममध्ये आणलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 6:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'आता या टीममधूनच रिटायर व्हायचं...', हार्दिक हट्टाला पेटला, मुंबईच्या स्टारकडून शब्द घेतला!









