advertisement

आता तुमचं वय पाहून मिळणार सोशल मीडिया अ‍ॅक्सेस? सरकारची नवी योजना, पाहा नियम काय असू शकतात 

Last Updated:

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलाय. मात्र हे करत असताना सायबर घटनांमध्येही वाढ झालीये. यात लहान मुलांना जास्त फसवलं जातंय. यामुळेच सरकार आता योग्य ती पावलं उचलणार आहे.

टेक न्यूज
टेक न्यूज
नवी दिल्ली : देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये लहान मुलंही आपली अकाउंट ओपन करतात. ज्यामुळे ते वाईट मार्गाला लागणे किंवा चुकीच्या गोष्टी त्यांच्या नजरेत पडतात. एवढंच नाही तर सायबर फ्रॉडचेही ते बळी ठरतात. आता केंद्र सरकारने लहान मुलांना आणि टिनेजर्सला सोशल मीडियाच्या दूर ठेवण्यासाठी एका नव्या पद्धतीवर विचार करतेय. ते पूर्णपणे बॅन करण्याऐवजी वयाच्या आधारावर वेगवेगळ्या लेव्हलच्या परवानग्या देण्याचा प्लॅन करताय.
सरकारकडून उद्योग जगत आणि विशेषज्ञांकडून चर्चा सुरू आहे. यात वयाच्या हिशोबाने पॅरेंटल कंट्रोल, स्क्रीन टाइमची लिमिट, काही फीचर्सवर बंदी आणि प्लॅटफॉर्मचे उत्तरदायित्व वाढवण्यासारख्या सूचनांचा समावेश आहे. वयाची मर्यादा काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चर्चेमध्ये 13 वर्षांहून कमी वय आणि 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ऑप्शनवर बोलणं होतंय. अधिकाऱ्यांनुसार सध्या जे सेफगार्ड्स आहेत, ते पुरेसे नाहीत. मुलं हे सहज खोटं वय टाकून अकाउंट तयार करताय. ग्रामीण भागांमध्ये आणि गरीब कुटुंबांमध्ये एकच फोन अनेक लोक शेअर करतात. यामुळे वय तपासणे कठीण आहे.
advertisement
सरकारचा हेतू लहान मुलांचा चुकीच्या ऑनलाइन गोष्टींपासून बचाव करणे आहे. पण एकदाच बॅन करण्याऐवजी यावर संतुलित मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात पॅरेंट्सला जास्त कंट्रोल देणे, प्लॅटफॉर्म आणखी जबाबदार बनवणे आणि यूझर्सचं वय योग्य प्रकारे चेक करणे या पद्धतींचा समावेश आहे.
advertisement
नवा नियम लागू झाल्यास येऊ शकतात या अडचणी 
एक्सपर्ट्स म्हणतात की, वयाची मर्यादा 16 किंवा 18 वर्षे केली तर प्लॅटफॉर्मला आपली धोरणे बदलावी लागतील. सोबतच प्रायव्हसी आणि  मुलांचे काही अ‍ॅक्सेस काढून घ्यावे लागतील. ग्रामीण भागात एकच फोन अनेक लोक वापरतात ज्यामुळे हे नियम लागू करणं आव्हानात्मक ठरू शकतं.
advertisement
सरकार अजुनही अनेक मॉडलवर विचार करतेय. यामध्ये वयाच्या हिशोबाने वेगवेगळे निर्बंध लावण्याचा समावेश आहे. या पूर्ण प्रकरणावर आयडी नियमांमध्ये बदल करुन अमलबजावणी केली जाऊ शकेल. हे पाऊल मुलांची सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने आहेत. मात्र प्रायव्हसी लागू करण्यात प्रॉब्लम आणि डिजिटल अॅक्सेस मर्यादित करण्यावरही लक्ष दिलं जातंय. सध्या अंतिम निर्णय झालेला नाही. सरकार सर्व पक्षांचा सल्ला ऐकूण प्रमुख निर्णय घेईल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
आता तुमचं वय पाहून मिळणार सोशल मीडिया अ‍ॅक्सेस? सरकारची नवी योजना, पाहा नियम काय असू शकतात 
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement