NCP : राष्ट्रवादीमध्ये ना वाद, ना फूट! शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय?

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटानं केला आहे. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवून हा दावा केलाय.

शरद पवार विरुद्ध अजित पवार, लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात
शरद पवार विरुद्ध अजित पवार, लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटानं केला आहे. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवून हा दावा केलाय. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाने सरकार विरोधात राहण्याची भूमिका घेतली तर अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचं पाऊल उचललं.
अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासह सरकारमध्ये सहभागी झालोय असा दावा केला होता.
अजित पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी निवड केल्याचे म्हटलं होतं.
निवडणूक आयोगानेही अजित पवारांच्या पत्रानंतर शरद पवार गटाला पत्र पाठवून म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं, त्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा करणे दुर्दैवी असून त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळावी असं शरद पवार गटानं म्हटलं आहे.
advertisement
शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नसून पक्षामध्येही फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे, त्यामुळे आता निवडणूक यावर काय निर्णय घेतंय याकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
2 जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असल्याचा दावाही अजित पवारांनी केला, पण अजूनही अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून त्यांच्या मागे किती आमदार आहेत, याबाबत स्पष्ट आकडा सांगितलेला नाही. अजित पवारांनाही याबाबत विचारणा केली असता गरज आहे तेवढे आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : राष्ट्रवादीमध्ये ना वाद, ना फूट! शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement