Laxman Hake Dhananjay Munde :धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाकेंनी शड्डू ठोकला, अंजली दमानियांना इशारा देत म्हणाले, ''तुमचं नाव...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Laxman Hake Dhananjay Munde : अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शड्डू ठोकला आहे. हाके यांनी थेट दमानियांवर हल्लाबोल केला आहे.
जालना: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांच्याविरोधात विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही आक्रमक झाल्या आहेत. तर, दुसरीकडे अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शड्डू ठोकला आहे. हाके यांनी थेट दमानियांवर हल्लाबोल केला आहे.
जालनामध्ये मंगळवारी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. मुंडे यांना लक्ष्य केले जात असून त्यांच्या विरोधात मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. राज्यातील ओबीसी नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे हाके यांनी सांगितले.
अंजली दमानियांवर हाकेंचे टीकास्त्र...
लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली दलालिया ठेवावे. निवडक नेत्यांची प्रकरणं उकरुन काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायेच, हा अंजली दमानिया यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका हाके यांनी केली. अंजली दमानिया यांनी जेवढी प्रकरण उपस्थित केली, त्या प्रकरणांचे पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले.
advertisement
ओबीसींविरोधात षडयंत्र...
लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचं षडयंत्र रचले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आणि टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र आहे. रोहित पवार यांचा आयटी सेल सोशल मीडिया वरती ओबीसी नेत्यांना टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
advertisement
संतोष देशमुख प्रकरणाचे राजकारणासाठी भांडवल...
संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारणासाठी भांडवल केले जात असल्याचा आरोपही हाके यांनी केला. तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट आहे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 05, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Laxman Hake Dhananjay Munde :धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाकेंनी शड्डू ठोकला, अंजली दमानियांना इशारा देत म्हणाले, ''तुमचं नाव...''







