पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी अजितदादांची नवी खेळी; थेट सासुरवाडीतूनच कामाला सुरुवात!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत महायुतीला पाठिंबा दिला. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे पक्षात दोन गट पडले आहेत.
धाराशिव, 27 ऑगस्ट, बालाजी निरफळ : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत महायुतीला पाठिंबा दिला. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे पक्षात दोन गट पडले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता पक्ष आपल्याच ताब्यात कसा राहिला यासाठी अजित पवार गटाकडून फिल्डिंग लावली जात असल्याचं पहायला मिळत आहे.
धाराशिव जिल्ह्यात अजित पवार गटानं पाच हजार कार्यकर्त्यांकडून शपथ पत्र घेतलं आहे. यातील तीन हजार शपथ पत्रे ही वरिष्ठ स्थरावर दाखल देखील केली आहेत.अजित पवार हे धाराशिव जिल्ह्याचे जावई आहेत, पूर्वीपासूनच त्यांची या जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड राहिलेली आहे.
त्यातच आता राष्ट्रवादीमध्ये गटबाजी उफाळून आल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी आपलं लक्ष जिल्ह्यावर केंद्रीत केलं आहे. अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांकडून शपथ पत्र घेण्यात आलं आहे. अजित पवार यांनी जिल्ह्याचा विकास करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना संजय बनसोडे यांनी दिली आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
August 27, 2023 12:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी अजितदादांची नवी खेळी; थेट सासुरवाडीतूनच कामाला सुरुवात!