Pandharpur: पंढरीत 400 वर्षांची परंपरा धोक्यात, पण एका निर्णयाने सावरली वारकरी परंपरा!

Last Updated:

पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून, यामध्ये महाद्वार काल्याचा देखील समावेश आहे.

News18
News18
पंढरपूर : मागील अकरा पिढ्यापासून सुरू असलेली महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या अघटित घटनेमुळे खंडित होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, हरिदास कुटुंबातील ११ वर्षीय बालकाच्या हातामध्ये विठ्ठलाच्या पादुका देत काल्याची परंपरा साजरी करण्यात आली.
यंदा हरिदास घराण्यातील एका तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे महाद्वार काला साजरा होणार का,असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जवळपास ४०० वर्षाची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास, पुजारी व संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी घेतला. त्यानुसार मदन महाराज हरिदास यांचे अकरा वर्षाचे नातू अमोघ याच्या गळ्यात पागोटे व हातात पादुका देण्यात आल्या.
advertisement

हरिदास व नामदास घराण्याकडून काला

आषाढी व कार्तिकी वारीमध्ये हरिदास व नामदास घराण्याच्या वतीने महाद्वार काला करण्याची परंपरा आहे.
संत पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने दिलेल्या पादुका मस्तकावर धारण करून महाद्वार काला
करण्याची परंपरा आहे. यावेळी जागोजागी गुलाल, बुक्का व लाह्यांची उधळण करण्यात आली. हजारो भाविकांनी काल्याचे दर्शन घेतले.
advertisement

दहीहंडी फोडून  काल्याची परंपरा

नामदास महाराज यांनी अमोघ हरिदास यास पंढरपुरात खांद्यावर घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच
प्रदक्षिणा, दहीहंडी फोडणे यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकास नदी स्नान, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून काल्याची परंपरा पूर्ण करण्यात आली.

काय आहे  आख्यायिका?

पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून, यामध्ये महाद्वार काल्याचा देखील समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेवून काला करण्याची परंपरा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: पंढरीत 400 वर्षांची परंपरा धोक्यात, पण एका निर्णयाने सावरली वारकरी परंपरा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement