pankaja munde : पुन्हा एकदा ताईसाहेब? पंकजा मुंडेंबद्दल मोठी बातमी, बीडच्या राजकारणाचं चित्र बदलणार?

Last Updated:

जागावाटपाची यादी जाहीर कधी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता बीडमध्ये माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

(पंकजा मुंडे)
(पंकजा मुंडे)
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. जागावाटपासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमध्ये काही विद्यमान खासदारांना नारळं दिलं जाणार आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. फक्त जागावाटपाची यादी जाहीर कधी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता बीडमध्ये माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे ऐवजी पंकजाताईंना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. खुद्द पंकजा मुंडे सुद्धा आपल्या भाषणातून तसे संकेत देत आहे.
बीडचं राजकारण हे मुंडे घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असंच हे समीकरण आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष असला तरी मुंडे घराण्याला टाळू शकत नाही. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून त्या भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. पण आता पंकजा मुंडे यांना केंद्र सरकारमध्ये बोलावण्याची शक्यता आहे.
advertisement
पंकजाताई की प्रीतम मुंडे?
बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये नेहमीच्या विद्यमान खासदारांनी दुसऱ्यांदा संधी देण्याचं प्रमाणं हे कमी आहे. त्यामुळेच प्रीतमताईंच्या ऐवजी पंकजाताईंना लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर पंकजा मुंडेंना बीडमधून जागा दिली तर तिथे शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, पंकजा मुंडे निवडणुकीला उभ्या राहिल्या तर मागील 5 वर्षांची कसर भरू काढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
'मला पाच वर्षाचा वनवास मिळाला, आता पुन्हा वनवास नको'
विशेष म्हणजे, 'मला राजकारणात 20 वर्ष झाली, मला पाडलं ते बरं झालं. मला संघर्ष पाहायला मिळाला. हा महाराष्ट्र फुले,शाहू,आंबेडकरांचा आहे. तुमच्या समर्पण मूळे माझं हृदय जड झालं आहे. माझ्या नशिबात काय लिहिलंय माहित नाही. मी खूप वेदना सहन केल्यास आहे. कोणीही माझ्याएवढे संकट झेलली नाहीत. हे प्रेम मी तुमचा विकास करून देणार आहे, प्रेमाने तुम्ही माझी ओटी तुम्ही भरली आहात, मी परिक्रमा यात्रा काढली लोकांनी माझ्यावर जेसीबीने फुले उधळली. माझा खांदा दुखत आहे. दोन महिने दुखू नये यासाठी मी इंजेक्शन घेतली आहे. दोन महिन्यानंतर घरी बसले तरी चालेल. तुम्ही माझ्याबरोबर राहणार आहात की नाही? मला पाच वर्षाचा वनवास मिळाला. आता पुन्हा वनवास नको. दोन्ही हात वर करून हाताच्या मुठी आवळा आणि शपथ घ्या. मी कधीही झुकत नाही. मी थकणार नाही, थांबणार नाही. मी कधीही कोणासमोर झुकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुढे काय होणार याचे संकेत दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
pankaja munde : पुन्हा एकदा ताईसाहेब? पंकजा मुंडेंबद्दल मोठी बातमी, बीडच्या राजकारणाचं चित्र बदलणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement