'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pankaja Munde PA Anant Garje Wife : अनंत गर्जे यांच्या सासरच्या मंडळींनी हत्येचा आरोप केला आहे. तर, अनंत गर्जे यांच्या विरोधातला कोणता पुरावा वडिलांना पाठवला, याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. अनंत गर्जे यांच्या सासरच्या मंडळींनी हत्येचा आरोप केला आहे. तर, अनंत गर्जे यांच्या विरोधातला कोणता पुरावा वडिलांना पाठवला, याची माहिती समोर आली आहे.
अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरू होती. यातून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
>> वडिलांना Whats App वर काय पाठवलं?
डॉक्टर असलेल्या गौरीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी गौरीने आपल्या वडिलांना अनंत गर्जेविरोधातला पुरावा पाठवला होता. गौरीसमोर तो पुरावा समोर आल्यानंतर आभाळ कोसळलं होतं. मात्र, त्यानंतरही तिने संयमी भूमिका घेतली होती, अशी माहिती समोर येऊ लागली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांना दिलेल्या तक्रारीनुसार, गौरीने ३० सप्टेंबर रोजी हिने वडिलांना व्हॉट्स अॅप काही फोटो पाठवले होते. हे फोटो पाहून घरातील मंडळीही पोरीच्या संसारासाठी चिंताग्रस्त झाले.
advertisement
>> गौरीने पाठलेल्या व्हॉट्स अॅपमध्ये काय?
गौरीने पाठवलेल्या हॉस्पिटलमध्ये लातूरमधील एका रुग्णालयाचे काही कागदपत्रे असल्याचे दिसून आले. 16/11/2021 रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्वीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसल्याचे त्यात दिसून आले. यामध्ये किरण असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद करण्यात आले होते. त्या कागदपत्रावरुन अनंत याचे किरण या महिलेशी काही तरी संबंध असल्याचा संशय वडिलांना आला. त्यानंतर गौरीला फोन करुन विचारले तेव्हा घर शिफ्ट करताना हे कागदपत्र सापडले असल्याचे तिने वडिलांना सांगितले. या प्रकारानंतर वडिलांनी गौरीला घरी माघारी बोलावले होते. मात्र, तिने आपण घरी आल्यास अनंत आत्महत्या करेल आणि आपलं नाव सुसाइड नोटमध्ये लिहील अशी धमकी देत होता, असे गौरीने वडिलांना सांगितले होते. अनंतच्या अफेअरबद्दल त्याचा भाऊ, बहीण यांना कल्पना होती. मात्र, त्यांनीही गौरीला धमकी दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट


