पनवेलमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं, मतदानाआधी सगळ्यात मोठा घोळ समोर

Last Updated:

उद्या २ डिसेंबरला राज्यात सर्वत्र मतदान घेतलं जाणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पनवेल महापालिका हद्दीत मतदार यादीतील सर्वात मोठा घोळ समोर आला आहे.

News18
News18
विनय म्हात्रे, प्रतिनिधी नवी मुंबई: महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या २ डिसेंबरला राज्यात सर्वत्र मतदान घेतलं जाणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पनवेल महापालिका हद्दीत मतदार यादीतील सर्वात मोठा घोळ समोर आला आहे. इथं एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल २६८ मुलं असल्याचं समोर आलं आहे.
एवढंच नव्हे तर हे सर्वजण एकाच घरात राहत असल्याचं मतदार यादीतून स्पष्ट होतं आहे. हा सगळा घोळ समोर आल्यानंतर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी खळबळजनक दावे केले आहेत. मतदार यादीत आढळलेले हे सर्व मतदान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी तोडगा निघाला नाही, तर आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील म्हात्रे यांनी दिली.
advertisement
हा सगळा प्रकार पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील मतदार यादीमध्ये आढळला आहे. इथं एका व्यक्तिला चक्क 268 मुले असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे ही सर्व 268 मुलांची नावे ही उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश मधील तरुणांची आहेत. ही सर्व मुलं हरीश नावाच्या व्यक्तीची असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या प्रभागात तब्बल २ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला.
advertisement
मतदार यादी नंबर ४७,४८ आणि ५० मध्ये हा सगळा घोळ आहे. शिवाय मतदार यादी क्रमांक १८३ आणि १८४ मधील मतदार हे पनवेलमध्ये अस्तित्वात नसलेल्या इमारतीतील रहिवासी दाखवले आहे. तसेच ज्या घरात २६८ लोकांची नोंद झाली, त्या घरात आणखी ४०-५० इतर लोकांची नावं देखील नोंदवल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं. या २६८ लोकांमध्ये ८ ते १० मराठी नावं आहेत. बाकी लोक उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत. या प्रकरणी कारवाई झाली नाही, तर आपण मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे, अशी माहितीही म्हात्रे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पनवेलमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं, मतदानाआधी सगळ्यात मोठा घोळ समोर
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List:  २९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोण
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement