advertisement

Parinay Fuke On Shiv Sena : 'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले

Last Updated:

Parinay Fuke On Shiv Sena : आमदार फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवू असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.

'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले
'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले
भंडारा: मागील काही महिन्यांपासून विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या एका वक्तव्याने भाजप-शिवसेना शिंदे गटात जोरदार वादाची ठिणगी पडली आहे. आमदार फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवू असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,  भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार परिणय फुके यांनी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना मीच शिवसेनेचा बाप असल्याचे म्हटले. फुके यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला. फुके यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना स्टाइलने त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
advertisement
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. परिणय फुके यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला जिल्हा बँक निवडणुकीत मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेविरोधात काँग्रेसला मदत...

advertisement
कुंभलकर यांनी पुढे म्हटले की, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी फुके यांनी काँग्रेस उमेदवाराला 6 मते देण्याचे षडयंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू असा इशारा त्यांनी दिला.
advertisement

परिणय फुके नेमके काय म्हणाले?

परिणय फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात म्हटले की, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य परिणय फुके यांनी शिवसेनेच्या टीकेवर केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parinay Fuke On Shiv Sena : 'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement