Parner Vidhan Sabha: पारनेरमध्ये शरद पवारांचा डाव; जाएंट किलर निलेश लंकेंची पत्नी विधानसभेच्या रिंगणात

Last Updated:

Maharashtra Elections Parner Assembly Constituency : महाविकास आघाडीने निलेश लंकेना बक्षीस म्हणून पारनेरमधून त्यांच्या पत्नीला तिकिट दिलं आहे. महायुतीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू होती

Parner Assembly Constituency Elections Results
Parner Assembly Constituency Elections Results
पारनेर :  महाराष्ट्राच्या काही विधानसभेच्या जागा लोकसभेच्या निवडणुकांपासून राज्यभर गाजल्या. त्यातली एक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरची जागा. लोकसभेत भाजपच्या सुजय विखे पाटील यांना हरवणाऱ्या निलेश लंके यांचा हा मतदारसंघ. नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश लंके यांनी गाजवली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते पारनेरचे आमदार होते आणि त्यांनाच शरद पवारांनी लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणाच उतरलेल्या लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. त्या पारनेरची जागा लंके खासदार झाल्याने सध्या रिक्त आहे. महाविकास आघाडीने निलेश लंकेना बक्षीस म्हणून पारनेरमधून त्यांच्या पत्नीला तिकिट दिलं आहे.  महायुतीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू होती आणि अखेर ती जागा अजित पवारांना म्हणजे राष्ट्रवादीला सुटली. पारनेरमध्ये आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असेल. शरदचंद्र पवार गटाच्या राणी लंके विरुद्ध अजित पवार गटाचे काशिनाथ दाते असा सामना पारनेर विधानसभेसाठी होणार आहे.
सुरुवातीला पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवारांबरोबर महायुती सरकारच्या पाठिशी होते. पण लोकसभेआधी त्यांनी तुतारी हाती घेतली. निलेश लंकेंना अजित पवारांची साथ सोडल्याचं डबल गिफ्ट मिळालं आहे. निलेश लंके यांना खासदारकीसाठी तिकिट दिल्यानंतर आता त्यांच्या पत्नीला म्हणजेच राणी लंकेंना पारनेरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभेत पती खासदार आणि विधानसभेत पत्नी आमदार व्हावी यासाठी ते आता कसून तयारी करत आहेत. निलेश लंकेंनी लोकसभेत घेतलेली इंग्रजी शपथही गाजली होती. सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता ते नेता, शेतकरी पार्श्वभूमी आणि तरुण नेतृत्व यामुळे निलेश लंके यांन लोकप्रियता मिळाली. त्यांनी अवघ्या पाच वर्षात विधानसभेचं आणि नंतर लोकसभेचं तिकिट मिळवत दिल्ली गाठली आहे. आता राणी लंके रिंगणात आहेत.
advertisement

पारनेर विधानसभा मतदारसंघ इतिहास

2004 पासून पारनेर विधानसभेची निवडणूक शिवसेना जिंकत आहे. निलेश लंकेंनी राष्ट्रवादीसाठी 2019 मध्ये हा गड परत मिळवला होता. 2004, 2009 आणि 2014 सलग तीन निवडणुका विजयराव औटी यांनी शिवसेनेसाठी जिंकून दिल्या. तीन टर्म आमदार राहिलेल्या औटी यांचा गेल्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केला.

2009 विधानसभा निवडणूक निकाल

advertisement
निलेश लंके – राष्ट्रवादी - 139,963
विलासराव औटी – शिवसेना - 80,125
गेल्या निवडणुकीत निलेश लंके पहिल्यांदाच विधानसभा लढवत असूनदेखील त्यांना 40 हजारांवर मताधिक्य मिळत त्यांनी  तीन टर्मच्या आमदारांवर विजय मिळवला.

2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभेत भाजपला पराभव पत्करावा लागला. निलेश लंके जाएंट किलर ठरले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांना शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभूत केलं. शरद पवार लंकेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले तर निलेश लंकेंविरोधात अजित पवार स्वतः प्रचार करत होते. आणि त्यांच्या निमित्तानेच काका-पुतण्यांमधील संघर्ष सगळ्यांना दिसला होता. या निवडणुकीत स्वतःच्या पारनेर विधानसभा क्षेत्रातून लंके यांना 38200 एवढं चांगलं लीड मिळालं. पारनेर विधानसभा क्षेत्रातून सुजय विखे यांना 92340  तर लंके यांना 130440 एवढी मतं मिळाली.
advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.
1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
2. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस)
advertisement
6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
8. राहुरी - प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
12. कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parner Vidhan Sabha: पारनेरमध्ये शरद पवारांचा डाव; जाएंट किलर निलेश लंकेंची पत्नी विधानसभेच्या रिंगणात
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement