Parth Ajit Pawar : १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना, पार्थ पवारांवर सरकारची मेहरनजर? नव्या आरोपाने अजितदादा अडचणीत

Last Updated:

Parth Ajit Pawar Land Scam : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता अडचणीत आल्याचे चित्र आहे.

१००० कोटींची जमीन ३०० कोटींना, पार्थ पवारांवर सरकारची मेहरनजर? नव्या आरोपाने अजितदादा अडचणीत
१००० कोटींची जमीन ३०० कोटींना, पार्थ पवारांवर सरकारची मेहरनजर? नव्या आरोपाने अजितदादा अडचणीत
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता अडचणीत आल्याचे चित्र आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीला १८०० कोटींचे मूल्य असलेली जमीन ३०० कोटींमध्ये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. महार वतनाच्या जमिनीवर हा व्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने आता यावरून राजकारण चांगलेच तापणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने मुंढवा परिसरातील जमीन बाजारभावापेक्षा खूप कमी दरात खरेदी केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणावरून पुणे जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

आरोप काय?

कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीची बाजार किंमत सुमारे १८०४ कोटी रुपये असून, हा भूखंड केवळ ३०० कोटी रुपयांच्या व्यवहारातून खरेदी झाल्याचा आरोप आहे. त्याहूनही मोठा आरोप म्हणजे, या व्यवहारानंतर फक्त दोन दिवसांत स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
advertisement
सामान्य नागरिकांना फ्लॅट खरेदी करताना लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, मात्र कोट्यवधींच्या व्यवहाराला विशेष सवलत का? असा प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला आहे. सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात, तेव्हा लाखो रुपयांची स्टँप ड्युटी भरावी लागते. मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा “विशेष सूट” फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात? असा सवाल त्यांनी केला.
advertisement
advertisement

ईडी चौकशीची मागणी...

विजय कुंभार यांनी म्हटले की, हा व्यवहार १० कोटीच्या वरील असल्याने EOW आणि ED ने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही कुंभार यांनी केली. १ लाख रुपये Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कसे आले ? अनसेक्युअर्ड लोन होते की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने दिले असा प्रश्न त्यांनी केला.
advertisement
या व्यवहारावर विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐन निवडणुकीच्या आधीच पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने अजित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होणार आहेत. या आरोपांमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी दिवसांत हा मुद्दा राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्या कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parth Ajit Pawar : १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना, पार्थ पवारांवर सरकारची मेहरनजर? नव्या आरोपाने अजितदादा अडचणीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement