Parth Pawar Land Scam : निलंबनाचा प्रस्ताव आधीच गेला पण सूत्र हलल्याने हाताला लकवा! निलंबित तहसीलदारासंबंधी मोठी माहिती समोर

Last Updated:

Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

निलंबनाचा प्रस्ताव आधीच गेला पण सूत्र हलल्याने हाताला लकवा...  निलंबित तहसीलदारासंबंधी मोठी माहिती समोर
निलंबनाचा प्रस्ताव आधीच गेला पण सूत्र हलल्याने हाताला लकवा... निलंबित तहसीलदारासंबंधी मोठी माहिती समोर
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकरणावरून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित करण्यात आलेले तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आज वातावरण तापल्यानंतर तहसीलदाराचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीद्वारे झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या व्य जमीन व्यवहारात अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. येवले यांच्या निलंबनाची फाईल माध्यमांत बातमी येण्यापूर्वीच २० ऑक्टोबरला महसूल विभागाकडे पाठवली होती, अशी विश्वसनीय सूत्रांनी दिली.
advertisement
पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीने बाजार मूल्यानुसार सुमारे 1,804 कोटी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. या व्यवहारात स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश फक्त दोन दिवसांत देण्यात आले आणि स्टँप ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरल्याचा दावा करण्यात आला होता.

मागच्या महिन्यात निलंबनाचा प्रस्ताव, फाइल कोणी अडवली?

advertisement
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणातील या अनियमिततेत महसूल विभागातील अधिकारी आणि काही स्थानिक स्तरावरील निर्णय हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने तहसीलदार सूर्यकांत येवले यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आढळून आल्यानंतर विभागाने निलंबनाचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महसूल विभागाने प्रस्ताव २० ऑक्टोबरला पाठवला होता, मात्र प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. राजकीय वातावरण तापल्यानंतर आज या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. उच्चस्तरावर हा व्यवहार दबावाखाली झाला का? विशेष सवलतींचा निर्णय कुणाच्या निर्देशावर घेण्यात आला? हे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
advertisement
दरम्यान, महसूल विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण या निलंबनामुळे पार्थ पवारांच्या जमिनीच्या व्यवहारावर चौकशीची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parth Pawar Land Scam : निलंबनाचा प्रस्ताव आधीच गेला पण सूत्र हलल्याने हाताला लकवा! निलंबित तहसीलदारासंबंधी मोठी माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement