एका तासात 41 कॉल, घटनेच्या रात्री डॉक्टर तरुणी अन् प्रशांत बनकर कुठे होते? मोठी अपडेट समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Satara Woman Doctor Death Case: फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला अटक केली आहे. दोघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नवनवी माहिती समोर येत आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी फलटण: सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला अटक केली आहे. दोघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नवनवी माहिती समोर येत आहे. याबाबतचे काही व्हॉट्सअॅप चॅटही समोर आले आहेत. शिवाय घटनेच्या रात्री महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर नक्की कुठे होते? याची माहितीही आता समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर महिला आणि आरोपी प्रशांत बनकर दोघेही एकत्र होते. दोघंही आपल्या घराच्या खाली बसले होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला होता. याच वादातून दोघंही घराजवळ बसले होते. तत्पूर्वी डॉक्टर महिलेनं एका तासाच्या कालावधी प्रशांत बनकरला तब्बल ४१ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
दोघांमध्ये वाद झाल्यानंतर महिला डॉक्टर रात्री बाराच्या सुमारास रागाच्या भरात घराजवळून निघून गेली. यानंतर ती फलटण येथील एका हॉटेलमध्ये राहायला गेली. इथं त्यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केल्याची माहिती, पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांच्यात नेमका कोणत्या कारणातून वाद झाला होता. याचा तपास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी एकत्र बारामतीला गेले होते. दोघांनी बारामती येथील ज्युडीओमधून शॉपिंगही केल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस दोघांमधील चॅटींग, फोन कॉल आणि इतर तांत्रिक माहितीचा सविस्तर तपास करत आहेत. यातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 27, 2025 2:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका तासात 41 कॉल, घटनेच्या रात्री डॉक्टर तरुणी अन् प्रशांत बनकर कुठे होते? मोठी अपडेट समोर


