मद्यविक्री परवान्यांचं सर्वपक्षीय 'कॉकटेल', कोणकोणत्या नेत्यांच्या मुलांच्या नावे दारूच्या कंपन्या?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Liquor License Policy: राज्य सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिले जाणार आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, जयंत पाटील हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. पण दारु परवान्याच्या वाटपात सरकारने अजिबात मापात पाप केलं नाही. महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवान्यांचे वाटपाचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिले जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मात्र दारु विक्री परवान्यांची ही खिरापत सर्वपक्षीयांना मिळणार असल्यानं सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही तेरी भी चूप मेरी भी चूपचा पवित्रा घेतला आहे.
मद्यविक्री परवान्यांचं सर्वपक्षीय 'कॉकटेल'
advertisement
भाजप- 5 नेते- 40 परवाने
राष्ट्रवादी काँग्रेस- 4 नेते- 32 परवाने
राष्ट्रवादी (शरद पवार)-3 नेते -24 परवाने
पंकजा मुंडेंचा मुलगा, आर्यमन पालवे यांच्या रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीजला परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे.
नितीन गडकरी यांचे पुत्र, सारंग गडकरी हे संचालक असलेल्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीजला परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे.
advertisement
अजित पवार यांचे पुत्र , जय पवारांचे व्यावसायिक भागीदार सदानंद बापट यांच्या अॅडलर्स बायो एनर्जी, असोसिएटेड ब्लेंडर्सला परवाने दिले जाणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा मुलगा, प्रतीक पाटील हे अध्यक्ष असलेल्या राजाराम बापू पाटील सहकाही साखर कारखान्याला परवाने दिले जाणार आहेत...
माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे पुतणे, महेश देशमुख संचालक असलेल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीजलाही मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहे...
advertisement
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोणतेही नवे मद्य परवाने दिले नाहीत, असे ते म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मद्यविक्री परवान्यांचं सर्वपक्षीय 'कॉकटेल', कोणकोणत्या नेत्यांच्या मुलांच्या नावे दारूच्या कंपन्या?


