देवेंद्रजींना मी तसं बोललेच नव्हते, पूजा मोरेंचा कंठ दाटला, अर्ज माघारीनंतर धायमोकलून रडल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pooja More Jadhav: भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधामुळे पूजा मोरे जाधव यांना प्रभाग क्रमांक दोनमधून भरलेला अर्ज माघारी घ्यावा लागला.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत मी टीका केल्याचे अनेक जण समाज माध्यमांवर लिहित आहेत. परंतु मी तसे शब्दप्रयोग केलेच नव्हते, असे सांगत आपल्यावरील आरोप पूजा मोरे यांनी फेटाळून लावले. तसेच काही लोकांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला उमेदवारी अर्ज माघार घ्यायला भाग पाडले, असे आरोप त्यांनी केला. गरिबाच्या घरातील मुलीने इथपर्यंत मजल मारणे सोपी गोष्ट नव्हती पण काहींना हे न बघवल्याने त्यांनी चुकीचा नरेटिव्ह पसरवून मला बदनाम केल्याचे पूजा मोरे म्हणाले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाने पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु भाजप आणि संघ कार्यकर्त्यांनी पूजा मोरे यांच्या मागील काही वर्षांतल्या विधानांचा संदर्भ देऊन उमेदवारीच्या निर्णयावर प्रचंड टीका केल्याने अखेर त्यांना अर्ज माघारी घ्यावा लागला. उमेदवारी अर्ज माघार घ्यावा लागल्यानंतर पूजा मोरे यांना भावना अनावर झाल्या, त्या प्रचंड रडल्या.
advertisement
देवेंद्रजींना मी तसं बोललेच नव्हते, पूजा मोरे यांच्याकडून आरोपांचे खंडन
मराठा आरक्षण चळवळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी खालच्या शब्दात टीका केल्याचे सांगितले जाते. पण टीका करणारी मी मुलगीच नाहीये. मंचावरून दुसऱ्याच मुलीने कुणीतरी भाषण केले होते, असे सांगत आपल्यावरील आरोपांचे पूजा मोरे यांनी खंडन केले. तसेच मराठा आरक्षण चळवळीतील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे योगदान मला माहिती आहे. मराठा आरक्षणाबद्दल त्यांचे कामही मला माहिती आहे, असेही पूजा मोरे म्हणाल्या.
advertisement
पूजा मोरे यांना का ट्रोल केले जात आहे?
मराठा आरक्षण चळवळीत भाषण करताना आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही... अशा आशयाचे विधान पूजा मोरे यांनी केल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेत टीका करणाऱ्याला उमेदवारीच कशी मिळू शकते? असा सवाल भाजप आणि संघ परिवारातील लोक विचारीत आहेत.
तसेच पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारले नाही, असे पूजा मोरे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा दाखला देऊन त्या हिंदुत्वविरोधी असल्याचे म्हणत महापालिका निवडणुकीत त्यांचे काम करणार नसल्याचा प्रचार समाज माध्यमांवरून भाजप कार्यकर्त्यांनी केला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवेंद्रजींना मी तसं बोललेच नव्हते, पूजा मोरेंचा कंठ दाटला, अर्ज माघारीनंतर धायमोकलून रडल्या










