Municipal Election : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने खातं उघडलं, कपिल पाटलांचा पुतण्या बिनविरोध
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजयाचे खाते उघडले आहे.प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
Bhiwandi Municipal Corporation Election 2026 : नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे,याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे, कारण अर्ज माघारी घेण्याची मुदत जवळजवळ संपुष्ठात येत आली आहे.असे असताता आता भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजयाचे खाते उघडले आहे.प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.त्यामुळे पुरुषोत्तम पाटील यांच्या मान सरोवर येथील निवासस्थानी विजय जल्लोष करण्यात आला आहे.
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पहिला विजय मिळवला आहे.प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयानंतर पुरुषोत्तम पाटील यांच्या मान सरोवर येथील निवासस्थानी विजय जल्लोष करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे अभिनंदन करीत हा विजय भिवंडीतील विजयाची नांदी ठरेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.विशेष म्हणजे 24वर्षांच्या दरम्यान झालेल्या चार निवडणुकीत कोणीही बिनविरोध विजयी झाला नव्हता तो विक्रम भाजपाचे सुमित पाटील यांनी पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत केला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा आहे. तसेच पुरुषोत्तम पाटील यांची पहिल्यांदा 2012 मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये ते दुसऱ्यांदा जनतेतून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले होते. तर तिसऱ्यांदा आता बिनविरोध निवडून आले आहेत.
advertisement
आरक्षण
दरम्यान भिवंडी निजामपुर महापालिकेत 23 वॉर्डमधील 90 जांगावर निवडणुक पार पडणार आहे. या 90 पैकी भिवंडी महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती (SC) 3 जागा त्यापैकी 2 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) 1 सर्वसाधारण ST जागा आरक्षित आहे. मागासवर्ग प्रवर्ग (OBC) 24 जागा आहेत.त्यातील 12 जागा OBC महिला यांच्यासाठी राखीव असणार आहे. सर्वसाधारण (Open) - 62 जागा, त्यातील 31 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. भिवंडी महापालिकेलसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर निकाल 16 जानेवारी 2026 ला लागणार आहे.
advertisement
भिवंडी महानगरपालिकेचा 2017 चा पक्षनिहाय निकाल
एकूण जागा 90
काँग्रेस 47
भाजप 19
शिवसेना 12
समाजवादी पक्ष 2
कोणार्क आघाडी 4
इतर 10
view commentsLocation :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 4:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Election : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने खातं उघडलं, कपिल पाटलांचा पुतण्या बिनविरोध











